
रायगडच्या अलिबाग तालुक्यातील कुर्डुस गावात विहिरीवर दहीहंडी बांधून गोविंदा उडी मारून ती फोडतात.
या आगळ्या वेगळ्या दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणाहून लोकांची गर्दी होते.
कुर्डुसमधील विहिरीवरील दहीहंडीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी
Raigad Kurdus Dahi Handi : मुंबई, ठाणे, कल्याण यांसारख्या महानगरांमध्ये दोरीला बांधलेल्या हंड्या आणि या हंड्या फोडण्यासाठी मानवी मनोरे चरले जाताना आपण नेहमीच पाहत असतो. पण विहिरीवरची दहीहंडी ही आगळी वेगळी हंडी तुम्ही कधी पाहिली आहे का? ही हंडी रायगडमध्ये अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते.
रायगडच्या अलिबाग तालुक्यातील कुर्डुस गावामध्ये अनोख्या पद्धतीने हंडी उत्सव साजरा केला जातो. साधारणत: जसे मानवे मनोरे रचून हंडी फोडली जाते, तशीच पण काहीश्या वेगळ्या पद्धतीने दहीहंडी फोडली जाते. कुर्डुस गावात विहिरीवर दहीहंडी बांधली जाते. गोविंदा आपापल्या सहकाऱ्यांच्या साथीने विहिरीवरुन उंचउडी मारुन दहीहंडी फोडतो.
उडी मारत हंडी फोडण्याच्या प्रयत्नात गोविंदा विहिरीच्या पाण्यात पडतात. विजेत्या गोविंदांना गदा आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येते. कुर्डूसमधील ही दहीहंडी आता इतकी लोकप्रिय झाली आहे, की ती पाहण्यासाठी मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणाहून माणसं येत असतात. कुर्डुसमधील यंदाच्या विहिरीवरील हंडीचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गावामध्ये काहीतरी वेगळं करायचे या हेतून कुर्डूस गावच्या ग्रामस्थांनी ही विहिरीवरील दहीहंडी सुरु केली होती. मागील अनेक वर्षांपासून ही अनोख्या प्रकारचा दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. हा सण आता इतरांसाठी आकर्षण ठरत आहे. यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि ब्लॉगर्सची संख्या मोठी असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.