Dada Bhuse
Dada BhuseSaam Tv

Lalit Patil case: मंत्री दादा भुसे आरोप करणाऱ्या सुषमा अंधारेंना पाठवणार अब्रू नुकसानीची नोटीस

Dada Bhuse : ललित पाटील प्रकरणावरून सुषमा अंधारे दादा भुसे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यावर भुसे आक्रमक झाले आहेत. ते अंधारेंना अब्रु नुकसानीची नोटीस पाठवणार आहेत.
Published on

Dada Bhuse On Susham Andhare Allegations:

ललित पाटील प्रकरणावरून राजकारण तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर कडाडून टीका केली जात आहे. यात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. दादा भुसेंच्या मदतीनेच ललित पाटील हा ससून रुग्णालयात भरती होता. दादा भुसे हे ललित पाटील यांना ओळखत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. दरम्यान दादाजी भुसे यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावलेत. अंधारे यांना आपण अब्रु नुकसानीचा नोटीस पाठवणार असल्याचं दादाजी भुसे म्हणालेत.(Latest News)

पत्रकारांशी बोलतना भुसे म्हणाले, आपल्या महामहीम मॅडम पहिल्यांदा चार- पाच दिवसाच्यानंतर ऑनलाईन मी बोलल्यानंतर मला वाटतं त्यांचं समाधान झालंय. परत त्यांनी काल- परवा परत काही विषय घेतला. तर मी उद्या त्यांना अब्रू नुकसानीची नोटीस देणार असल्याचं दादाजी भुसे म्हणालेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. भुसे हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याच नाशिकमध्ये इतका मोठा ड्रग्ज प्रकरण समोर आल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर ठाकरे गटाकडून सरकारविरोधात मार्चा काढला जाणार आहे. त्याला उत्तर देताना दादाजी भुसे म्हणाले की, लोकशाही प्रक्रियेत ज्याला त्याला मनोगत मांडण्याचा अधिकार आहे.

मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. ड्रग हे विघात कृत्य आहे. ते नाशिक, महाराष्ट्र किंवा भारत वा जगाच्या पाठीवर असू दे. त्याच कोणीच समर्थन करणार नाही. परंतु ड्रग्ज प्रकरणातून राजकारण होत आहे, असं भुसे म्हणालेत. मला वाटतं राजकारणात या गोष्टी चालतात. मी महत्त्व देत नाही. राजीनामा घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचा आहे.जो जो मूळ विषय आहे, त्याला बगल देण्याचे काम याच्या माध्यमातून होत असल्याचं ते म्हणाले.

रम्यान ठाकरे गटाकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी काही शैक्षणिक संस्थांनी महाविद्यालय आणि शाळांना सुट्ट्या दिल्या आहेत. शासकीय निर्णय नसताना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. त्यावर बोलताना भुसे म्हणाले की, असं काही असेल, तर याची चौकशी केली जाईल. अशा संस्थांवर कारवाई पण केली जाईल.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे

ललिल पाटील प्रकरणाचा तपास केला पाहिजे. या प्रकरणात राजकीय लोक आहेत. दादा भुसे, शंभुराज देसाई यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी अंधारे यांनी केली होती. राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ललित पाटीलचा जय सिंघानिया होऊ नये, असा टोलादेखील अंधारे यांनी लगावला होता.

Dada Bhuse
Sushma Andhare News | Shambhuraj Desai यांनी सुषमा अंधारेंना 24 तासांचं अल्टिमेटम का दिलं? कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com