Nagpur News: नागपूर विमानतळावरून ८ कोटी ८१ लाखांचे ड्रग्ज जप्त; सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई

Nagpur Crime News: कस्टम्स विभागाने गुरुवारी (ता. ४) नागपूर विमानतळावरून तब्बल ८ कोटी ८१ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केलं आहे.
Nagpur Airport Drug Case
Nagpur Airport Drug Case Saam TV

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

Nagpur Airport Drug Case

मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात अमली पदार्थ तस्करीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हीच बाब लक्षात घेता सीमा शुल्क विभागाचे अधिकारी सतर्क झाले आहे. कस्टम्स विभागाने गुरुवारी (ता. ४) नागपूर विमानतळावरून तब्बल ८ कोटी ८१ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केलं आहे. अमली पदार्थ तस्करी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील ही सर्वात मोठी कारवाई आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nagpur Airport Drug Case
Weather Forecast: ऐन उन्हाळ्यात कोसळणार पावसाच्या सरी; येत्या २४ तासांत 'या' भागात पावसाची शक्यता

याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा तामिळनाडू येथील रहिवासी आहे. तो युगांडाहून दोहा मार्गे कतार एअरवेची फ्लाइट क्र QR-590 ने गुरुवारी पहाटे नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) आला होता.

कस्टम अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे आधीच सापळा रचला होता. आरोपी हा ग्रीन चॅनलवरून जात असताना त्याला कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडवलं. त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याजवळ तब्बल २ किलो ९३७ ग्रॅम अमली पदार्थ (ड्रग्स) आढळून आले.

आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किमत ८ कोटी ८१ लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातंय. याप्रकरणी कस्टम अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली असून त्याची सध्या कसून चौकशी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग्ज रॅकेटविरोधात मोठी कारवाई केली होती. या कारवाईत तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. पुण्यानंतर आता नागपूरमध्ये कस्टम विभागाने केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. यामुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Nagpur Airport Drug Case
RBI Action: भारतीय रिझर्व्ह बँकेने १० बँकांना ठोठावला लाखो रुपयांचा दंड; ग्राहकांवर काय होईल परिणाम?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com