Kolhapur Crime News: कॉलेजच्या नावाखाली कॅफेत अश्लील चाळे; ४ जोडपी पोलिसांच्या ताब्यात

कॉलेजच्या नावाखाली बाहेर येऊन अंधाऱ्या खोलीत त्यांचे अश्लील चाळे सुरू होते.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime NewsSaam TV
Published On

Crime News In Kolhapur: कोल्हापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील एका कॅफेवर पोलिसांनी छापेमारी करत काही जोडप्यांना ताब्यात घेतलं आहे. अंधाऱ्या खोलीत हे जोडपे अश्लील चाळे करत असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोल्हापूर (Kolhapur) शहरात अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या निर्भया पथकाला कॅफेवर पाठवले. निर्भया पथकाकडून कॅफेवर धाड टाकण्यात आली आहे.

Kolhapur Crime News
Delhi Metro Viral Video: तू कुत्ती है भौंक... नही तू भौंक...;दिल्ली मेट्रोत महिलांची जबराट भांडणं, पाहा VIDEO

निर्भया पथकातील पोलिसांनी एकून चार जोडप्यांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेले महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. कॉलेजच्या नावाखाली बाहेर येऊन अंधाऱ्या खोलीत त्यांचे अश्लील चाळे सुरू होते. मिरजकर तिकटी, उमा टॉकीज चौक, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर येथे ही छापेमारी झाली आहे.

आई वडील जिवाचं रान करून आपल्या मुलांना शिक्षण देतात. शाळा आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण मुलांना घेता यावे यासाठी मोठी मेहनत घेतात. आपल्या मुलांनी कॉलेजमध्ये जावे, शिकून अभ्यास करुन मोठे व्हावे असं प्रत्येक पालकांना वाटतं. मात्र काही मुलं-मुली कॉलेजच्या नावाखाली अशा प्रकारे घरच्यांची फसवणूक करतात. सदर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Kolhapur Crime News
Manipur Viral Video Case: मणिपूर अत्याचार प्रकरणातील पीडितांची सुप्रीम कोर्टात धाव, CBI चौकशी आणि खटला आसामला हस्तांतरित करण्यास विरोध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com