औरंगाबाद महापालिकेत चक्क कुत्रे घोटाळा? RTI मध्ये धक्कादायक माहिती उघड

औरंगाबाद महानगरपालिकेत राजकीय वातावरण तापलं आहे.
stray dogs
stray dogssaam Tv
Published On

नवनीत तापडीया

औरंगाबाद : विविध खात्यांच्या विकासकामांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. परंतु,औरंगाबाद शहरातील भटक्या कुत्र्यांवरून महानगरपालिकेत (Aurangabad Municipal Corporation) राजकीय वातावरण तापलं आहे. भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी दिलेल्या कंत्राटातच भ्रष्टाचार (corruption) झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाने आरोप केला आहे. परंतु, या कंत्राटात घोटाळा झाला तेव्हा पालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता होती. माहितीच्या अधिकारातून (Right to information) मागवलेल्या माहितीतून हा घोटाळा समोर आला आहे, असा दावाही भाजपकडून करण्यात आला आहे. यामुळे हा विषय औरंगाबादमध्ये सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

stray dogs
Cuttputlli : 'कठपुतली'चं रोमँटिक गाणं आलं, अक्षय कुमार-रकुलप्रीतचा रोमान्स (व्हिडिओ पाहा)

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या महापालिकेत झालेल्या एका घोटाळ्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. शहरातील मोकाट कुत्रे पकडण्यासाठी दिलेल्या कंत्राटातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेवकाकडून करण्यात आला आहे.औरंगाबाद शहरात गेल्या सात वर्षात किती कुत्रे पकडण्यात आले, याची माहिती भाजपचे नगरसेवक गोकुलसिंग मलके यांनी माहितीच्या अधिकारातून महापालिकेकडून मागवली होती. तसेच कोणत्या एजन्सीच्या मार्फत हे कुत्रे पकडण्यात आले आणि त्यांच्यावर किती खर्च झाला, याचाही माहिती मागवली होती. मात्र महानगरपालिकेने दिलेली माहिती पाहून मलके यांना धक्काच बसला. कारण मागिल ७ वर्षात तब्बल २८ हजार ५३३ कुत्रे पकडल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. यासाठी तब्बल २ कोटी ६६ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

ज्या एजन्सीला काम देण्यात आले होते, याबाबतची माहिती मलके यांना माहितीच्या अधिकारात मिळाली आहे. ज्यात महाराजा एजन्सी औरंगाबाद,ब्ल्यू क्रॉस सोसायटी पुणे,होप अँड अनिमल ट्रस्ट झारखंड,जया इंटर प्रायजेस राजस्थान,अरिहंत वेलफेअर सोसायटी,उस्मानाबाद यांचा समावेश आहे. पण भाजपने यावर आक्षेप घेत आरोप केला आहे. भाजपच्या नगरसेवक मलके यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

stray dogs
Maharashtra Monsoon Session: विधान भवन परिसरात आमदारांचा राडा; सत्ताधारी- विरोधकांमध्ये धक्काबुक्की, पाहा व्हिडिओ

"आमच्या नगरसेवकांनी शहरातील मोकाट कुत्र्यांसंदर्भात जी माहिती मागवली ती अत्यंत खळबळजनक आहे. मागील सात वर्षात मोकाट कुत्रे पकडण्यासाठी महापालिकेने तीन कोटी खर्च केला आहे. हे कुत्रे पकडण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सी पैकी एक एजन्सी शिवसेना पदाधिकाऱ्याची आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसत असून याची चौकशी झाली पाहिजे."

- प्रमोद राठोड, माजी उपमहापौर, औरंगाबाद

मी मागवलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये 8824 मोकाट कुत्रे धरल्याची माहिती मनपाने दिली आहे. यावर प्रत्येकी 900 रुपये खर्चही करण्यात आला आहे. जर शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे धरले आहेत तरीही नागरिकांची ओरड कायम आहे. मी शासनाला विनंती करतो की याची चौकशी करण्यात यावी हा पूर्ण प्रकार फक्त कागदावर झालेला आहे. जर याची चौकशी केली तर खरं काय ते बाहेर येईल.

- गोकुळसिंग मलके, माजी नगरसेवक

मागील सात वर्षात मनपाने किती मोकाट कुत्रे पकडले आणि त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे दर किती होते ? याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

वर्ष एकूण श्वान दर(प्रति श्वान)

2015-16 672 625 रु

2016-17 307 625 रु

2017-18 75 -

2018-19 3440 900 रु

2019-20 4534 950 रु

2020-21 10,681 730 रु

2021-22 8824 900 रु

एकूण - 28,533 कुत्रे पकडले यासाठी एकूण 2 कोटी 66 रुपये खर्च आला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com