independence day 2025 : 'मांस विक्रीचे फतवे नंपुसक करायचे'; मांसाहार बंदीवरून महायुतीत मतभेद,VIDEO

Chicken mutton Shop news : मांसाहार बंदीवरून विरोधकांनी रान उठवलेलं असताना आता महायुतीतही मतभेद पाहायला मिळतोय. त्यातच मांसाहार बंदीचा निर्णयाची जबाबादारी घ्यायला कोणीही तयार नाही? त्यामुळे या वादात राजकीय वर्तुळात नेमकं काय घडतयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
mahayuti news
mahayuti Saam tv
Published On
Summary

मांसाहार बंदीवरून वाद

मासांहार बंदी नेमकी का आणि कशासाठी?

मांसाहार बंदीचा निर्णय हटवणार का?

घटनेची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई होणार का?

मांसाहार बंदी हा मुलभूत अधिकारावर घाला

कल्याण- डोंबिवली महापालिकेनं स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्रीवर बंदी घातली..त्यापाठोपाठ राज्यातील इतर 7 महापालिकांनी मांसाहार विक्रीवर बंदी घालण्याचा फतवा काढला.. मात्र पालिकांच्या या फतव्याविरोधात आता विरोधकांनी रान उठवलंय.. आमचे पूर्वज मांसाहार करायचे मग ही बंदी कशाला? असा सवाल आव्हाडांनी विचारलाय. तर राऊतांनी हा फतवा नंपुसक करण्यासाठी आहे का? असा खोचक सवाल विचारलाय..

mahayuti news
Stray Dog Issue : मी २५०० भटक्या कुत्र्यांना मारून झाडाखाली गाडलं; आमदाराचा खळबळजनक दावा

मांसाहारावरून विरोधक आक्रमक

दरम्यान अजित पवारांनी महापालिकांच्या या निर्णयावरून अधिकाऱ्यांचे कान टोचलेत. त्यामुळे मांसाहार बंदीवरून महायुतीतही मतभेद असल्याचं समोर आलयं..

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय आमच्या सरकारनं घेतलाच नाही, असा दावा केलाय.. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांसाहार विक्रीच्या बंदीवर टीका केलीय.

mahayuti news
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार खिडकीत कबूतर येणं शुभ की अशुभ?

मुळात शासननिर्णयाचा हा जीआर 1988 चा असल्याचं जरी सरकार सांगत असलं तरी या निर्णयाची अंमलबजावणी आताच का? स्वातंत्र्यदिनीच लोकांच्या व्य़क्तीगत स्वातंत्र्यावर घाला का? लोकांनी काय खावं आणि काय खाऊ नये, हे ठरवण्याचे अधिकार प्रशासनाचा कसा? असे अनेक सवाल उपस्थित होतायत. त्यामुळेच

मांसाहार विक्री बंदीवर महायुती एकमतानं निर्णय घेणार की अंतर्गत कुरघोडींची चर्चा सुरु असताना या निर्णयावरील मतभेदामुळे महायुतीचीच गोची होणार.. हे पाहणं महत्त्वाचं आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com