Gulabrao Patil : ...तर आकाशातून पाणी टाकू का? मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

शिंदे-फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पाणीटंचाईवरून एक वादग्रस्त विधान केलं आहे.
Gulabrao patil
Gulabrao patilSaam tv
Published On

Gulabrao Patil Latest News : शिंदे-फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पाणीटंचाईवरून एक वादग्रस्त विधान केलं आहे. पुराच्या पाण्यामुळे पाणी पुरवठा करणारे पंपच बंद आहेत, तर काय आकाशातून पाणी टाकू का? असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. जळगावात माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.

Gulabrao patil
Uddhav Thackeray : ठाकरे कुटुंबीयांचं टेन्शन वाढवणारी बातमी; वकील महिलेनं केला गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. परतीच्या पावसाने अक्षरश: महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. पावसामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातही तुफान पाऊस झाला.

जिल्ह्यातील धरणगाव आणि एरंडोल परिसरात पावसामुळे पाणीपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांवर दुषित पाणी पिण्याची वेळ आली. याबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारलं असता, 'पुराच्या पाण्यामुळे पाणी पुरवठा करणारे पंपच बंद आहेत, त्यामुळे आकाशातून पाणी टाकू का'? असं विधान त्यांनी केलं आहे.

Gulabrao patil
Rahul Gandhi News: राम-रावण उल्लेखावरुन राजकारण पेटलं; राहुल गांधींची काँग्रेस नेत्याकडून प्रभु रामाशी तर भाजपकडून रावणाची तुलना

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गुलाबराव पाटील म्हणाले, परतीच्या पावसामुळे सध्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणारे पंप पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. तसेच या पंपामध्ये गाळ साचल्याने साहजिक पंपही बंद आहेत. हे पंप बंद झाल्यामुळे धरणगाव, एरंडोल आणि जळगाव याठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होतोय. पंप दुरुस्त करायला पाणबुडीही पाण्यामध्ये जाऊ शकत नाही, एवढी पाण्याची पातळी वाढली आहे. विहिरी सुद्धा नदीमध्येच आहेत, मग पाणी आकाशातून टाकायचं का? असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com