Uddhav Thackeray : ठाकरे कुटुंबीयांचं टेन्शन वाढवणारी बातमी; वकील महिलेनं केला गंभीर आरोप

ठाकरे कुटुंबीयांचं टेन्शन वाढवारी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Rashmi Thackeray
Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Rashmi ThackeraySaam TV

Uddhav Thackeray News : ठाकरे कुटुंबीयांचं टेन्शन वाढवारी एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेकाशीर मालमत्ता जमावल्याचा आरोप एका वकील महिलेनं केला आहे. इतकंच नाही, तर याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. (Uddhav Thackeray News Today)

Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Rashmi Thackeray
Rohit Pawar : आमदार रोहित पवारांच्या अडचणी वाढणार? 'त्या' प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

गौरी भिडे असं आरोप करणाऱ्या वकील महिलेचं नाव आहे. गौरी यांनी उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीबद्दल काही आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांची संपत्ती भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेनामी मालमत्ता आहे, असं गौरी भिडेंनी याचिकेत म्हटलं आहे.

यापुर्वी आपण यासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल केलेली आहे. माझ्याकडे त्यांच्या भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे आहेत. या याचिकेमागे कसलेही राजकारण नाही, असंही गौरी भिडे यांनी म्हटलं आहे. या याचिकेत केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय अर्थ मंत्रालय, सीबीआय, मुंबई पोलीस आयुक्त, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना प्रतिवादी करण्यात आलेलं आहे.

Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Rashmi Thackeray
Mumbai Crime: मुंबईत ३ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा फोन; पोलिसांकडून तपास सुरू

ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय?

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे हे पर्यावरणमंत्री असताना २०२० ते २०२२ या कालावधीत सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर ४२ कोटी रुपये इतका होता, यामध्ये झालेल्या साडेअकरा कोटी रुपयांच्या नफ्यावरदेखील गौरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय? असा सवाल विचारताना त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी याचिकेत केली आहे.

दरम्यान, गौरी भिडे यांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे बुधवारी सुनावणी झाली. भिडे यांची याचिका स्वीकारण्यास कुणीही वकील तयार नसल्यानं त्या स्वत:चं कोर्टापुढे युक्तिवादासाठी उभ्या राहिल्या. मात्र त्यांच्या याचिकेवर हायकोर्ट कार्यालयानं काही आक्षेप घेतल्यानं ते दूर करण्याचे निर्देश देत कोर्टानं त्यांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. आता याप्रकरणी सुनावणी १६ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com