Kolhapur Politics: आता कशी वाजली घंटी? निकालानंतर कोल्हापुरात काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांना बॅनरबाजीतून प्रत्युत्तर

Kolhapur Politics: कोल्हापुरात मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसने बॅनरबाजीतून उत्तर दिलं आहे. आता कशी वाजली घंटी? असं म्हणत काँग्रेसने बॅनरमधून प्रत्युत्तर दिलं आहे.
आता कशी वाजली घंटी? निकालानंतर कोल्हापुरात काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांना बॅनरबाजीतून प्रत्युत्तर
Kolhapur PoliticsSaam tv

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूर : कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहु महाराज यांनी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने धूळ चारली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या टीकास्त्र सोडलं होतं. लोकसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांच्या टीकेला आता काँग्रेसने बॅनरमधून प्रत्युत्तर दिलं आहे. आता कशी वाजली घंटी? अशा आशयाचे बॅनर लावत युवक काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात युवक काँग्रेसच्याने एक अनोखे पोस्टर लावलं आहे. कोल्हापुरात या पोस्टरवरील मजकूर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा फोटो या पोस्टरवर आहे. तसेच या पोस्टवर आता कशी वाजली घंटी? असा मजकूर यावर लिहिण्यात आलेला आहे.

आता कशी वाजली घंटी? निकालानंतर कोल्हापुरात काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांना बॅनरबाजीतून प्रत्युत्तर
Lok Sabha Election Results: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या घसरत्या आलेखाला जबाबदार कोण? प्रशांत किशोर यांनी दिलं उत्तर

लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. 'बंटीची घंटी वाजवली पाहिजे, असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून हे पोस्टर्स लावण्यात आलं आहे.

आता कशी वाजली घंटी? निकालानंतर कोल्हापुरात काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांना बॅनरबाजीतून प्रत्युत्तर
Share Market Update: गुडन्यूज! मोदी सरकारच्या शपथविधीनंतर शेअर बाजारात वारं फिरलं; सेन्सेक्स सुसाट, निफ्टीनेही घेतली उसळी

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले होते?

दरम्यान, लोकसभा प्रचाराच्या सांगता वेळी महायुतीच्या रॅलीत मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. 'तुमचा टोल मी बंद केला. ८०० कोटी रुपयांची भरपाई सरकारने केली. बंटी पाटील यांना टोल लावला होता. त्यांची घंटी वाजवायची आहे. पुन्हा टोल नको ना? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी टीका केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com