Maharashtra Politics : महायुतीमध्ये महाभारत, मोठी गडबड होण्याची शक्यता, मविआच्या मोठ्या नेत्याचा अंदाज

Nana Patole : विधानसभा निवडणुकीआधी महायुती आणि महाविकास आघाडींच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
देवेंद्र फडणवीस
Devendra FadnavisSaam Tv
Published On

Nana Patole on Mahayuti and Devendra Fadnavis : महायुतीमध्ये सर्व काही ठीक नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी हात वर केले आहेत. पुढच्या महिन्यात काहीतरी गडबड होईल हे नाकारता येत नाही, असा अंदाज काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीआधी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडींच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

नाना पटोले म्हणाले की, महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हात वर केले आहेत. महायुतीमध्ये मोठी गडबड सुरू आहे. पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोर्टाच्या निकालाची आम्ही वाट पाहतोय. या निकालाकडून आम्हला फार अपेक्षा आहेत.

देवेंद्र फडणवीस
Badlapur Protest: बदलापुरातील आंदोलनाला हिंसक वळण; देवेंद्र फडणवीस राजीनामा का देत नाहीत? सुषमा अंधारेंचा सवाल!

निवडणुका कधी लागतील हे सांगता येत नाही. निवडणूक आयोग भाजपाच्या कार्यालयात बसत असल्याचे चित्र आहे. लाल किल्ल्यावरून भाषण देताना मोदी म्हणत होते वन नेशन वन इलेक्शन आणायचा आहे. मात्र देशांमधील चार राज्यातील निवडणुका देखील घ्यायला ते घाबरत आहेत, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस
Maharashtra Politics : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? नाना पटोलेंनी स्पष्ट सांगितलं, पाहा VIDEO

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती भयावह आहे. कायदा पोलिसांचा धाकच राहिला नाही. बेरोजगारांचा महाराष्ट्र निर्माण झालाय. आता सरकारचं एकच काम आहे, जनतेच्या नावाने कर्ज गोळा करा आणि त्या कर्जाला लुटा. तीन तोंडांचा हे सरकार लुटमारमध्ये लागलेला आहे, असे नाना पटोले म्हणाले.

जळगाव जिल्ह्यातील तीर्थयात्रेसाठी गेलेले श्रद्धाळू त्यांचा अपघातात नेपाळ येथे मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह आज जळगावात दाखल झालेत. थोडीशी तरी माणुसकी असती तर भाजपने आणि पंतप्रधानांनी आजचा कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि एकीकडे हे उत्साह साजरा करत आहेत. सर्वात संवेदनहीन प्रधानमंत्री या देशाने पाहिलाय, असा टोला यावेळी पटोले यांनी लगावला.

महाविकास आघाडी हाच चेहरा राहणार आहे. बैठकीतही आम्ही हे जाहीरपणे सांगितलं आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदापेक्षा महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र वाचवणं हे कर्तव्य आहे. यासाठी आम्ही सगळे काम करतोय, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com