Rahul Gandhi: राहुल गांधींचा आज महाराष्ट्र दौरा! सांगली, नांदेडला देणार भेट; कसे असेल नियोजन? वाचा सविस्तर

Rahul Gandhi Maharashtra Visit Schedule: राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सांगली येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असून विधानसभेआधी काँग्रेस श्रेष्ठींचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
Rahul Gandhi: राहुल गांधींचा आज महाराष्ट्र दौरा! सांगली, नांदेडला देणार भेट; कसे असेल नियोजन? वाचा सविस्तर
Rahul Gandhi SAAM TV
Published On

सांगली, ता. ५ सप्टेंबर २०२४

Patangrao Kadam memorial site inaugurated: राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. सांगली येथे काँग्रेसचे दिवंगत नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती, माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व 'लोकतीर्थ' स्मारकाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सांगली येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असून विधानसभेआधी काँग्रेस श्रेष्ठींचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. कसा असेल राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा? वाचा सविस्तर.

Rahul Gandhi: राहुल गांधींचा आज महाराष्ट्र दौरा! सांगली, नांदेडला देणार भेट; कसे असेल नियोजन? वाचा सविस्तर
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायचंय; CM शिंदेंचे खासदार पुत्र नेमकं काय म्हणाले?

राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा!

आज (५, सप्टेंबर) शिक्षक दिनानिमित्त भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती, माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व 'लोकतीर्थ' स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. विधानसभेच्या तोंडावर राहुल गांधी यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

कसा असेल कार्यक्रम?

सांगलीमधील कार्यक्रमाला येण्यापूर्वी राहुल गांधी यांच्यासह, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले हे नांदेडमध्ये भेट देणार आहेत. नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांना ते सांत्वनपर भेट देणार आहेत. नांदेडहून राहुल गांधी थेट कोल्हापूरला विमानाने जाणार असून त्यानंतर ते हेलिकॉप्टरने सांगली येथे पतंगराव कदम यांच्या नियोजित कार्यक्रमाला हजेरी लावतील.

Rahul Gandhi: राहुल गांधींचा आज महाराष्ट्र दौरा! सांगली, नांदेडला देणार भेट; कसे असेल नियोजन? वाचा सविस्तर
Pune Crime: पुण्यात हत्या, हल्ले, लूट काही थांबेना; विद्येचं माहेरघर की अंडरवर्ल्डचा अड्डा?

दरम्यान, डॉ. पतंगराव कदम यांनीच स्थापन केलेल्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात दहा एकर जागेवर त्यांचे दिमाखदार स्मारक साकारले आहे. या परिसरात पतंगराव कदम यांचा १८ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. काँग्रेस नेते आणि पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत कदम यांच्या संकल्पनेतून हे स्मारक साकारण्यात येत आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधींचा आज महाराष्ट्र दौरा! सांगली, नांदेडला देणार भेट; कसे असेल नियोजन? वाचा सविस्तर
Latur Crime : धक्कादायक! मध्यरात्री दबक्या पावलाने घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून ३४ वर्षीय महिलेवर केला अत्याचार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com