Rahul Gandhi: सावरकर यांच्या बदनामी प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधींना दिलासा

Rahul Gandhi : न्यायालयाने काही अटींवर राहुल गांधी यांना दाव्याच्या सुनावणीला हजर राहण्यास सूट दिली आहे. या दाव्यात पुराव्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्त्वाचे दस्तऐवज सुनावणी दरम्यान न्यायालयात मागवावे लागणार आहेत.
Rahul Gandhi Savarkar Case
Rahul Gandhi Saam Tv
Published On

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना काहीसा दिलासा मिळालाय. राहुल गांधींना सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याबाबत सूट देण्यात आलीय. दाव्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात स्वतः हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट मिळावी, असा अर्ज गांधींनी वकिलामार्फत न्यायालयात दाखल केला होता. विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी हा अर्ज अटी शर्तीवर मंजूर केला आहे.

सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधानाप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात येथील न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केलाय. या प्रकरणात हजर होण्यासाठी गांधी यांना न्यायालयाने १० जानेवारी ही तारीख दिली होती. त्यानुसार राहुल गांधी हे न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हजर झाले होते. या दाव्यात गांधींना २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

Rahul Gandhi Savarkar Case
Supreme Court: कामाच्या ठिकाणी सीनियर्सने फटकारले म्हणजे गुन्हा नव्हे; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

त्यानंतर राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी या दाव्यात गांधी यांना सुनावणी दरम्यान न्यायालयात स्वतः हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट मिळावी, असा फौजदारी न्याय संहिता कलम २५८ अन्वये न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

न्यायालयाने अटींवर दिली सूट

आमच्या अनुपस्थितीत या प्रकरणातील पुरावे नोंदविले गेले आहेत, असा आक्षेप घेणार नाहीत

सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील आरोपीला वेळोवेळी आवश्यक सूचना देतील

प्रत्येक सुनावणीला आरोपीचे वकील हजर राहतील

Rahul Gandhi Savarkar Case
Chief Election Commissioner: एकमत नसतानाही मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, काँग्रेस कोर्टात धाव घेणार

सुनावणी ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून घ्यावी

सावरकर यांचे ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवण्यात फार मोठे योगदान होते, असे सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या त्यांच्या दाव्यात नमूद केलंय. सावरकरांचे स्वातंत्र्य मिळवण्यातील योगदान तसेच अजून बऱ्याच काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना न्यायालयासमोर येणे. त्यासोबत राहुल गांधी यांना नैसर्गिक न्याय मिळण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. कायद्यातील तरतुदींनुसार या दाव्याची पुढील सुनावणी ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून घ्यावी. सद्य परिस्थितीत न्यायालयात या खटल्याची नोंद न्यायालयाचे निबंधक यांनी चुकीने ‘समरी ट्रायल’ अशी चुकीची केली आहे, असा अर्ज ॲड. पवार यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com