praniti shinde, Narendra Modi
praniti shinde, Narendra Modisaam tv

Praniti Shinde News: हाथ से हाथ जोड़ो अभियानात प्रणिती शिंदेची पंतप्रधान नरेंद्र माेदींवर टीका, म्हणाल्या हुकूमशाही...

Praniti Shinde Criticizes Narendra Modi: मी आमदार असेल माझ्या घरी, तुमच्यापेक्षा आम्ही मोठे नाही आहोत असेही आमदार प्रणिती शिंदेंनी नमूद केले.
Published on

Solapur News: देशामध्ये लोकांची हुकूमशाही आहे म्हणजेच लोकशाही आहे. कोणत्या पंतप्रधानाची हुकूमशाही नाहीये असं म्हणतात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (praniti shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना टोला लगावला आहे. सोलापुरात (solapur) हाथ से हाथ जोडो अभियाना दरम्यान शिंदे यांनी सोलापूरकरांशी संवाद साधला.

praniti shinde, Narendra Modi
Praniti Shinde News: 'महिलांकडे तुच्छ नजरेने बघणारे सरकार'; काँग्रेस महिला आमदार माेंदीबद्दल म्हणाल्या...

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या निवडणुका असू देत अथवा नसू देत काँग्रेस आणि मी सदैव तुमच्या सेवेत आहोत. कदाचित निवडणुका दरम्यान आम्ही तुमच्याकडे येणार नाही परंतु मात्र अडीअडचणीत तुमच्या सुखा दुखात मी सदैव तुमच्यासाठी धावून येईन. (Maharashtra News)

praniti shinde, Narendra Modi
Pandharpur News : 'या' प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी टाकळी ते मुंबई लाॅंगमार्च

आपलं नातं हे आमदार आणि मतदाराचा नसून आई आणि मुलीचा आहे. आम्ही जर नाही आलो तर कान धरून खाली बसवा तो तुमचा अधिकार आहे असे आमदार शिंदेंनी नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीचा तुमचा अधिकार आहे. देशात लोकांची शाही लोकशाही म्हणजेच लोकांची हुकुमशाही आहे. कोणत्या पंतप्रधानाची हुकूमशाही नाही आहे. आम्ही तुमचे सेवक आहोत, मी आमदार असेल माझ्या घरी, तुमच्यापेक्षा आम्ही मोठे नाही आहोत असेही आमदार प्रणिती शिंदेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com