Congress Leader Kidnap: राजकारणातील गुंडगिरी; काँग्रेस नेत्याचं भररस्त्यात अपहरण, जिल्हाध्यक्षाला मारहाण

Congress Leader Kidnapped: अहिल्यानगरमध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या अपहरणामुळे एकच खळबळ माजलीय. मात्र काँग्रेस नेत्याचं अपहरण नेमकं कोणी आणि कोणत्या उद्देशानं केलं? अपहरणाच्या या घटनेमुळे राज्यातील राजकारणातील गुंडगिरी कशी उघड झालीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Congress Leader Kidnapped
CCTV footage shows Congress district president Sachin Gujar being forcibly taken into a car in Shrirampur.saam tv
Published On
Summary
  • काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण

  • काँग्रेस कार्यकर्त्यांचं श्रीरामपूरमध्ये आंदोलन

  • अपहरणाआधी नेमकं काय घडलं?

श्रीरामपूरमधील याच अपहरणाच्या CCTV फुटेजनं राज्यात खळबळ माजलीय. मॅर्निंग वॉकला घराबाहेर पडलेले श्रीरामपूरमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना काही जणांनी कारमध्ये कोंबलं आणि त्यानंतर भररस्त्यात विवस्त्र करून त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.ज्यामुळे श्रीरामपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीरामपूरमध्ये आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदवलाय.

Congress Leader Kidnapped
Maharashtra Politics: आघाडीची थाटात घोषणा पण आठ दिवसातच काडीमोड; वंचित-काँग्रेसचं काही जमेना

मात्र अपहरणाआधी नेमकं काय घडलं? सचिन गुजर यांचे अपहरण करणारे कोण होते? पाहूयात. सचिन गुजरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. ज्यानंतर हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारत सचिन गुजर यांना मारहाण केली. याप्रकरणी चंदू आगेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलयं. दुसरीकडे सचिन गुजर यांना मारहाण करणाऱ्या हिंदत्ववादी संघटेनेच्या कार्यकर्त्यांनीही व्हिडिओ जारी करून मारहाण केल्याची कबुली दिलीय.

Congress Leader Kidnapped
Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

दरम्यान आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपहरणाची आणि मारहाणीची ही घटना घडल्यानं काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय. राजकीय नेत्यांची दादागिरी काही नवीन नाही. मात्र आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच मारहाण करून अपहरण केलं जात असेल. तर मुद्द्यांची लढाई गुद्द्यांनी लढण्याचा हा निर्लज्जपणा राज्यात कसा सुरु झाला? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं राजकारणातील गुंडगिरीचं भयाण वास्तव उघड झाल्यानंतरही गुंडांना कोण अभय देतयं. हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com