शाखा व्यवस्थापक यांची बदली झाल्याने मरखेलकरांच्या वतीने सत्कार

देगलूर तालुक्यातील मरखेल सर्कलमधील 17 खेडे असून आजूबाजूच्या सर्कलातील खेड्याचा युनियन बँकेत असंख्य खातेदार आहेत.
मरखेल बँक व्यवस्थापकाला बदलीनंतर निरोप
मरखेल बँक व्यवस्थापकाला बदलीनंतर निरोप

मरखेल ( जिल्हा नांदेड ) : देगलूर तालुक्यातील मरखेल येथील युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर नारायणराव चिंतलावार त्यांनी घेतलेली मेहनत मरखेलकरांना भावली आहे. कायद्याने कडक व मनाने नाजूक अशा पद्धतीने बँकेचे व्यवहार सुरळीत ठेवल्याने त्यांच्या नावाची कौतुक होत आहे. त्यांची सेवा कालानुसार बदली झाल्यामुळे त्यांची अहमदनगर येथे नियुक्ती झाली असून मरखेल येथील नागरिकांनी, व्यवसायिकांनी, बँक कर्मचाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. अनेकांचे त्याच्याशी मित्रत्वाचे नाते जुळल्याने मरखेलकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

देगलूर तालुक्यातील मरखेल सर्कलमधील 17 खेडे असून आजूबाजूच्या सर्कलातील खेड्याचा युनियन बँकेत असंख्य खातेदार आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन देत बँकेचा व्यवहार व्यवस्थित चालून बँकेला गालबोट न लागू देता कोविडच्या संपूर्ण लाॅकडाॅनच्या कठीण काळात सर्व सुरळीत चालू ठेवले. त्याचबरोबर कर्ज घेणारे खातेदारांना वेळेवर हप्ता भरण्यास मार्गदर्शन दिले. खातेधारक व कर्जधारक या सर्वांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणाऱ्या अशा शाखा अधिकाऱ्याची बदली होणे हे मरखेलकरांच्या मनाला चटका लावून जाणारी गोष्ट ठरली आहे.

हेही वाचा - कोरोना : नांदेड जिल्ह्यात 6 लाख 23 हजार 788 ची तपासणी

मरखेल येथून सेवा कालानुसार अहमदपुर येथे बदली झाल्याने चिंतलवार यांना अहमदपुरला स्थलांतरित व्हावे लागत आहे. त्यानिमित्ताने मरखेलकरांनी दि. 6 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास युनियन बँकेच्या कार्यालयात सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यात अनेकांनी शुभेच्छा दिल्या तर काहींनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केले. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी निजामोद्दीन माळेगावकर, प्रमुख पाहुणे नंदू धुमाळे ते होते. मरखेल सरपंच प्रतिनिधी मच्छिंद्र गवाले, दावणगिरी सरपंच गायकवाड, मा.पं.स.सदस्य पप्पूरेड्डी अर्धे, उपसरपंच संदीप पाटील, जिलानी पिंजारी, वाजीद मरखेलकर, अशोक कोमावार गफार मरखेलकर, फिरदोस मरखेलकर. सूत्रसंचालन म. सादिख मरखेलकर यांनी केले. यांच्यासह गफ्फार मरखेलकर व सादिख मरखेलकर मित्र मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन आक्रम अत्तार यांनी केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com