मराठमोळ्या अभिजीतच्या 'कॉक्रोच'चा धुमाकूळ, कॉक्रोच जनता पार्टीची भाजप-काँग्रेसवर सरशी

Cockroach Janata Party Abhijit Dipake Instagram Viral: मराठमोळ्या अभिजीत दीपकेच्या कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडियावर अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. तरुणाईच्या मोठ्या प्रतिसादानंतर इन्स्टाग्रामवर कॉक्रोच जनता पार्टीने भाजप आणि काँग्रेसलाही मागे टाकलं आहे. सहा दिवसातच कोट्यवधी फॉलोअर्स मिळवणाऱ्या CJPवरचा हा विशेष रिपोर्ट.........
“Abhijit Dipake’s Cockroach Janata Party goes viral as millions of young Indians rally behind the satirical movement on Instagram.”
“Abhijit Dipake’s Cockroach Janata Party goes viral as millions of young Indians rally behind the satirical movement on Instagram.”saam tv
Published On

एखाद्या सिनेमाची अचानक चर्चा सुरू होते आणि तो रात्रीतून हीट होतो अगदी तसंच काहीसे सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीसोबत झालंय. केवळ एका आठवड्यात CJP चे इन्स्टाग्रामवर दीड कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स झालेत. वाऱ्याच्या वेगाने ज्याच्या त्याच्या तोंडी CJPची चर्चा होतेय. विशेष म्हणजे या पार्टीला दिया मिर्झा, अनुराग कश्यप, कोंकणा सेन शर्मा यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनीही फॉलो केलंय. बेरोजगार तरुणांची तुलना कॉक्रोचशी केल्यावर काय होऊ शकतं हे तरुणाईने दाखवून दिलंय. कॉक्रोच जनता पार्टीची देशभरातल्या तरुणांमध्ये क्रेझ वाढतंच चाललीय. काँग्रेस आणि भाजपसारख्या बलाढ्य राष्ट्रीय पक्षांनाही क्रॉकोच जनता पार्टीनं अवघ्या काही दिवसांत इन्स्टाग्रामवर मागे टाकलंय.

विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसनं 2014 मध्ये इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलंय. त्यांचे फॉलोअर्स 1 कोटी 33 लाख एवढे आहेत. तर सत्ताधारी भाजपचं अकाऊंट 2015 साली सुरू करण्यात आलं असून त्यांचे फॉलोअर्स 80 लाख एवढे आहेत. तर सहा दिवसांपूर्वी सुरू केलेल्या क्रॉक्रोच जनता पार्टीचे दीड कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी "बेरोजगार युवक म्हणजे झुरळ आहेत, अशी टिप्पणी एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान केली होती. त्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रीया उमटल्यात. अभिजीत दीपके यांनीही विनोद आणि उपहासात्मक म्हणून कॉक्रोच जनता पार्टीची संकल्पना मांडली. मात्र आता तीला एक चळवळीचं रुप आलंय. मात्र यावरुन आता महायुतीतच राजकारण सुरु झालंय. शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय तर भाजपनं जोरदार टीका केलीय.

महागाई , इंधन टंचाई आणि नीट पेपरफुटीमुळे प्रस्थापित राजकीय पक्ष आणि यंत्रणेविरुद्ध तरुणाईमध्ये चीड आहे. सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचे निमित्त असले तरी विविध समस्यांनी त्रस्त असलेली तरुणाई या पार्टीच्या निमित्ताने व्यक्त होत आहे. अगदी गावागावातले बेरोजगार तरुण सोशल मीडियावर व्यवस्थेविरुद्ध बोलत आहेत. काही जणांनी तर CJPची जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशी पदेही वाटून घेतली आहेत. तर काही जण CJPने निवडणूक लढवावी की नाही यावर मते जाणून घेत आहे. त्यामुळे उपहासाने सुरु झालेली ही चळवळ भविष्यात कोणत्या दिशेने जाणार ? खरचं यातून समर्थ पर्याय लोकांना मिळणार का? याकडे देशाचे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com