
राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भातील कोंडी आज १० व्या दिवसानंतर सुटली. केंद्रातील भाजपच्या निरीक्षकांनी कोअर कमिटीच्या बैठकीत विधीमंडळाच्या गटनेते पदाची निवड केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असं जाहीर केलं. विधीमंडळाच्या गटनेत्याची घोषणा करण्यासाठी फडवणीस यांच्या नावाचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी ठेवला, त्याला पंकजा मुंडे आणि प्रवीण दरेकर यांनी अनुमोदन दिलं.
मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र महायुती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तीव्र नाराजी होती. तर गृहमंत्री पदावरून त्यांच्यावर टीका होत होती, तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ कशी पडली याची चार प्रमुख कारणे आहेत. ही काय कारणे आहेत हे जाणून घेऊ.
फडणवीसांच्या नावाला तशी सहजासहजी मान्यता मिळाली नाहीये. त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर भाजप आपला मुख्यमंत्री करणार हे निश्चित होते, मात्र त्यासाठी अडीच वर्षे सत्तेची धुरा सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदेंना समजवण्यासाठी फडवणीसांना दहा दिवस वेगळीच झुंज द्यावी लागलीय. राजकीय वर्तुळात चाणक्य तर जनसामन्यांमध्ये देवा भाऊ म्हणून उद्यास आलेले देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकारणात अनेक भूमिका साकारल्या आहेत.
महाराष्ट्र्रात महायुतीला खूप मोठं यश मिळालं आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठी भूमि्का आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती. त्यानंतर फडणवीस राजकारणात सक्रीय झाले होते. त्यांच्या कुटनितीमुळे शिवसेनेत बंडखोरी झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपसोबत येत सत्ता स्थापन केली. त्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली.
त्यातही फडणवीस यांची कुटनितीचा हात होता. परंतु लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. लोकसभेत मात्र १७ जागा महायुतीच्या ताब्यात आल्या. यानंतर देवेद्र फडणवीस हे अजून जास्त सक्रीय झाले. व्होट जिहादचा नॅरेटीव्ह सेट करत त्यांना महाविकास खेळ खराब केला.
फडणवीस यांनी तरुण आमदार म्हणून राज्याच्या राजकारणात उतरले आहेत. त्यामुळे ते कार्यकर्ता आणि सामान्य जनतेची नाडी ओळखून आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या रणनीतीने पुन्हा अँटी इन्कम्बन्सीचा सूर बदलला. महाराष्ट्रात १३२ जागा जिंकून भाजपने इतिहास रचला.
तर भाजपचा विजयाचा स्ट्राइक रेट हा ८७ टक्के केला. मराठा आणि ओबीसमध्ये संगममत करत दोन जातींमध्ये विभागणी झालेल्या हिंदू मतांना त्यांनी एकत्र आणलं. मुस्लीम समाज एकत्र येत एका विशिष्ट पक्षाला मतदान करतात. तर हिंदू समाजाने का एकत्र येत मतदान करून नये असं म्हणत त्यांनी निवडणुकीत रणशिंग फुकलं. त्यामुळेच महाराष्ट्रातील विजयानंतर भाजपने सत्तेची कमान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली असं म्हटलं जात आहे.
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपचा समावेश आहे. यांच्यात समन्वय साधणं हे फडवणीसांना चांगल्या प्रकारे जमतं. अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत राहून राज्याचा कारभार चालवला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना राज्यातील राजकारण चांगल्या प्रकारे माहितीये. दोन्ही नेते राजकारणातील माहीर नेते आहेत.त्यामुळे त्यांच्या तोडीस तोड असा नेता भाजपमध्ये फडणवीस व्यतिरिक्त दुसरा कोणीच असून शकत नाही, त्यामुळेच त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली.
देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाची निवड मानले जातात. ते आरएसएसच्याही जवळचे आहेत. देवेंद्र फडणवीस नागपुरातून येतात, त्यामुळे त्यांचा संघाशी चांगला समन्वय आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजपची सत्ता परत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी नितीन गडकरी, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांसारख्या नेत्यांऐवजी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं गेलं.
याचे कारण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा मित्र पक्ष शिवसेने आताचे उद्धव ठाकरे गट विरोधी पक्षात असताना फडणवीस यांनी भाजपला शिवसेना सोडून एकट्याने निवडणूक लढविण्याचे मान्य केले होते. वर्ष मुख्यमंत्रिपद संभाळल्यानंतरही त्यांनी संघासोबत व्यवस्थित समन्वय साधला होता. कोणताच आरोप त्यांच्यावर नसल्याने आणि लोकप्रियतेमुळे आरएसएसनेही त्यांना पुढील पिढीचा नेता निवडलाय.
मोदी आणि शहा यांच्या काळात फडणवीस हे राजकारणातील सर्वोच्चस्थानी आहेत. यामुळेच ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होत आहेत. दरम्यान २०२४ च्या लोकसभेतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांवर टीका होत होते. याच दरम्यान त्यांना दिल्ली बोलवलं जाईल आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं जाईल, अशी चर्चा सुरू होती. त्याचदरम्यान फडणवीसांनी आरएसएसच्या नेत्यांसोबत बैठका घेतल्या.
मिळालेल्या माहितीनुसार आरएसएस नेते लोकसभेच्या काळात सक्रिय नव्हते.मात्र विधानसभेच्या काळात फडणवीसांनी आरएसएसच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत त्यांना सक्रिय केलं.त्याचमुळे भाजपचा मोठा विजय झाला आणि सर्व गोष्टीमुळे फडणवीसांच्या हातात मुख्यमंत्रिपदाची सुत्रे जात आहेत.
देवेंद्र फडणवीस २०१४ साली मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. वयाच्या ४४ व्या वर्षी महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर १७ मुख्यमंत्री झाले, परंतु त्यापैकी फक्त दोनच नेते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले आहेत. एक वसंतराव नाईक आणि दुसरे देवेंद्र फडणवीस.
फडणवीस यांनी अभाविपमधून राजकीय प्रवास सुरू केला आणि ते नागपुरात नगरसेवक झाले. त्यानंतर महापौरपदी ते निवडून आले. १९९९ आणि २०१४ मध्ये नागपूर दक्षिण पश्चिममधून आमदार झाले. फडणवीस यांना पाच वर्षे सरकार चालवण्याचा अनुभव आहे.मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत फडणवीस आघाडीवर असण्यामागे हेही एक मोठे कारण आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.