Shinde Vs Dighe: ठाण्यात CM एकनाथ शिंदे विरूद्ध दिघे; शिंदेंना बालेकिल्ल्यात ठाकरे घेरणार, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे... गेल्या अडीच वर्षापासून देशाच्या राजकारणातील सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेला जिल्हा.याच जिल्ह्यात आनंद दिघेंच्या पुतण्या आणि त्यांच्या शिष्यामध्ये थेट लढत होणार आहे.
ठाण्यात CM एकनाथ शिंदे विरूद्ध दिघे; शिंदेंना बालेकिल्ल्यात ठाकरे घेरणार, वाचा स्पेशल रिपोर्ट
Cm Eknath Shinde Vs Kedar DigheSaam Tv
Published On

2024च्या निवडणूकीत दिघेंचं ठाणे शिंदेंचं ठाणे होईल का? हे येत्या 23 नोव्हेंबरला कळणारेय. कारण येत्या विधानसभेच्या निवडणूकीत शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंनी चक्रव्यूह रचलंय. कारण गेल्या २० वर्षांपासून ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाकरे गट केदार दिघेंना उतरवलं आहे.

केदार दिघे हे एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघेंचे पुतणे आहेत. आणि आता याच दिघेंच्या पुतण्याविरोधात दिघेंचा शिष्य एकनाथ शिंदे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.

ठाण्यात CM एकनाथ शिंदे विरूद्ध दिघे; शिंदेंना बालेकिल्ल्यात ठाकरे घेरणार, वाचा स्पेशल रिपोर्ट
Thackeray Group 1st List: CM शिंदेंविरोधात दिघेंना उमेदवारी, ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली संधी? वाचा...

ठाण्यात शिंदे विरूद्ध दिघे

एकनाथ शिंदे

  • आनंद दिघेंचे शिष्य, दिघेंच्या मृत्यूनंतर ठाणे जिल्हाप्रमुख.

  • नगरसेवक, सभागृह नेतेपद.

  • 2004 पासून आमदार.

  • 2014 युती सरकारच्या काळात मंत्री, पालकमंत्री.

  • 2019 मविआच्या काळात मंत्री.

  • 2022 ला शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख.

केदार दिघे

  • दिवगंत शिवसेना नेते आनंद दिघेंचे पुतणे.

  • 2006 साली शिवसेनेत प्रवेश, ठाणे आणि पालघरमध्ये कार्यरत.

  • ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम.

  • 2013 मध्ये युवासेनेच्या निरीक्षकपदी नियुक्ती.

  • 2017 मध्ये युवासेनेच्या सर्व पदांचा राजीनामा.

  • 2022 शिंदेच्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख.

ठाण्यात CM एकनाथ शिंदे विरूद्ध दिघे; शिंदेंना बालेकिल्ल्यात ठाकरे घेरणार, वाचा स्पेशल रिपोर्ट
MVA CM Face: मविआचा मुख्यमंत्री कोण? संजय राऊतांकडून वेळ, तारीख जाहीर

शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेमुळे ठाकरेंना ठाण्यात संघर्ष करावा लागल्याचं लोकसभेच्या निकालावरुन दिसलंय. तसंच दिघेंच्या मृत्यूनंतर शिंदेंच्या वर्चस्वामुळे केदार दिघेंना ही राजकीय स्थिरता मिळवण्यासाठी संघर्ष वाटेला आलाय. तेव्हा आता शिंदे विरुद्ध ठाकरे आणि दिघे सामना असून ठाकरे आणि दिघेंना आपल्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरलेल्या शिंदेचा वचपा काढता येणारेय. तेव्हा साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट सांगत शिंदे ठाकरेंनी रचलेलं हे चक्रव्यूह भेदतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com