CM Eknath Shinde News: उद्धव ठाकरेंच्या देवघरातील तो धनुष्यबाणही शिंदेंचाच! मुख्यमंत्री म्हणाले..,

Shivsena Dhanushyaban Symbol: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिलेला होता, असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं होतं.
Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath ShindeSaam TV
Published On

Eknath Shinde News : निवडणूक आयोगाने कागदावरचे धनुष्यबाण मिंधे गटाला दिले असले तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे खरे धनुष्यबाण माझ्याकडे आहे. शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुखांनी हे चिन्ह देव्हाऱ्यात ठेवलं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं. (Latest Marathi News)

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिलेला होता, असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं. म्हात्रेंच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. दरम्यान, यावर पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी यावर हसून उत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Sanjay Raut News : खासदार संजय राऊत पुन्हा अडचणीत; कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे औरंगाबादेत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी शिंदेंना उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला धनुष्यबाण बाळासाहेबांना तुम्हीच गिफ्ट दिला होता का? असा प्रश्न विचारला. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही अशी हात जोडत प्रतिक्रिया दिली आहे.

वडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी जाहीर करत सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर आता सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा दोन्ही गट एकमेकांना लक्ष्य करत असून टीका करत आहेत. (Maharashtra Political News)

Uddhav Thackeray Eknath Shinde
Pune Mahapalika Recruitment : खुशखबर! पुणे महापालिकेत होणार मोठी नोकरभरती; 'या' पदांसाठी करता येईल अर्ज

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "निवडणूक आयोगाने कागदावरचे धनुष्यबाण मिंधे गटाला दिले असले तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे खरे धनुष्यबाण माझ्याकडे आहे. शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुखांनी हे चिन्ह देव्हाऱ्यात ठेवलं आहे".

"शिवसेनाप्रमुखांनी पूजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडे आहे. 100 कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सुप्रीम कोर्टात आम्हीच जिंकू," असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला होता.

शितल म्हात्रे यांनी केलेलं ट्विट

मातोश्रीच्या देवघरातील धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिला होता, असा दावा शीतल म्हात्रेंनी केलाय. उद्धव ठाकरे काळजी करण्यासारखं काहीही नाही, असं म्हणत असले तरी आता त्यांची काळजी वाढलीय. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना एकनाथ शिंदेंनीच धनुष्यबाण दिला होता. आणि त्याचीच पूजा बाळासाहेब ठाकरे करत होते, अशी माहिती शीतल म्हात्रेंनी दिली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com