मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा व्हायरल व्हिडिओ खरा आहे का? नेमकं सत्य काय?

Narhari zirwal Viral Video : नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? वाचा
Narhari zirwal news
Narhari zirwal Viral VIDEO Saam tv
Published On
Summary

मंत्री नरहरींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

झिरवाळ यांच्याकडून व्हिडिओ बनावट असल्याचा दावा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओच्या पडताळणीचे आदेश

मंत्री नरहळी झिरवाळ यांचा तृथीयपंथीय व्यक्तीसोबतचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडिओवरून विरोधकांनी मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परंतु व्हायरल व्हिडिओ दोन-तीन व्हिडिओ जोडून तयार करण्यात आल्याचा आरोप मंत्री नरहळी झिरवाळ यांनी केला आहे. त्यामुळे नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे, याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ खरा निघाल्यास कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Narhari zirwal news
मंत्री नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ अचानक कसा बाहेर आणला गेला? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून गंभीर आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री झिरवाळ प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'नरहरी झिरवाळ यांनी मला फोन केला. त्यांनी मला सांगितलं की, दोन-तीन व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला पाहिजे. त्याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी तत्काळ एक तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करावी. या व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल. या व्हिडिओची सत्यता तपासल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि मी एकत्र निर्णय घेऊ'.

'मागच्या प्रकरणात चौकशी झाली. त्याचा संबंध झिरवाळ यांच्यापर्यंत गेला नाही. आता समोर आलेला व्हिडिओ गंभीर आहे. त्या व्हिडिओची सत्यता पडताळणे अत्यंत गरजेचे आहे. व्हिडिओ खरा निघाला, तर योग्य कारवाई होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Narhari zirwal news
भोंदूबाबाच्या विकृतीचा पॅटर्न, कवडीमोल चिंचोके, लाखोंना विकले, नकली साप आणि वाघानं गंडवलं

अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'अशोक खरातसोबत अनेक जणांचे फोटो आणि व्हिडिओ येत आहेत. परंतु त्याच्या गुन्ह्यात कोणाचा सहभाग आहे का, हे सिद्ध झाल्यावर कारवाई होईल. फोटोवरून दोषी धरता येणार नाही. या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहे. काही पीडित पुढे येत आहेत. आर्थिक फसवणूक झालेले लोक समोर येत आहेत. या प्रकरणात दुर्दैवी महिला पीडित आहेत, त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. ज्यांनी व्हिडिओ अपलोड केले आहेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com