Devendra Fadnavis : 'नवीन नागपूर'ला ११००० कोटींचा बूस्टर डोस, एनएमआरडीए आणि हुडको यांच्यात करार

Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एनएमआरडीए, एनबीसीसी आणि हडको यांच्यात नवीन नागपूर प्रकल्पासाठी दोन महत्त्वपूर्ण MoU करार झाले. ११,३०० कोटींचा निधी मिळाल्याने नागपूरचा विकास जागतिक दर्जाच्या व्यवसाय आणि वित्तीय केंद्रात होणार आहे.
Devendra Fadnavis :  'नवीन नागपूर'ला ११००० कोटींचा बूस्टर डोस, एनएमआरडीए आणि हुडको यांच्यात करार
Nagpur NewsSaam tv
Published On
Summary
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वपूर्ण MoU करार

  • हुडकोकडून ११,३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

  • एनबीसीसीमार्फत १,००० एकरांवर वित्तीय सेवा केंद्र उभारणी

  • नागपूरचा विकास जागतिक दर्जाच्या व्यवसाय व वित्तीय केंद्रात होणार

नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र (IBFC) म्हणून "नवीन नागपूर" या भव्य प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (NMRDA) आणि केंद्र सरकारच्या एनबीसीसी आणि हुडको (HUDCO) यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यामुळे नवीन नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार असून, नागपूरचा आर्थिक व व्यावसायिक चेहरा बदलणार आहे.

NBCC सोबत करार १,००० एकरांवर नवे आंतरराष्ट्रीय वित्तीयसेवा केंद्र

एनएमआरडीए आणि एनबीसीसी (इंडिया) लि. यांच्यात झालेल्या करारानुसार नवीन नागपूर प्रकल्पातील १,७१० एकरांपैकी १,००० एकरांवर विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे. उर्वरित ७१० एकर भावी विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis :  'नवीन नागपूर'ला ११००० कोटींचा बूस्टर डोस, एनएमआरडीए आणि हुडको यांच्यात करार
Nagpur: नागपूरकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, 4 ट्रक आणि बस टर्मिनल उभारणार; काय आहे नेमका प्लान?

हा विकास प्लग अँड प्ले मॉडेलवर आधारित असेल.

यात समाविष्ट होणाऱ्या सुविधा समाकलित भूमिगत उपयुक्तता टनेल्स, डिस्ट्रिक्ट कूलिंग सिस्टम, स्वयंचलित कचरा संकलन व वर्गीकरण प्रकल्प, स्टार्ट-अप्स, MSME, आयटी कंपन्या, व्यावसायिक केंद्रे, तसेच निवासी व मिश्र वापर प्रकल्प एनबीसीसीला या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार संस्था म्हणून नेमण्यात आले आहे. पुढील १५ वर्षांत तीन टप्प्यांत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठी एक सक्षम समिती स्थापन करण्यात येईल, ज्याचे अध्यक्ष एनएमआरडीएचे आयुक्त असतील.

Devendra Fadnavis :  'नवीन नागपूर'ला ११००० कोटींचा बूस्टर डोस, एनएमआरडीए आणि हुडको यांच्यात करार
Nagpur News: येस बँकेत मोठा राडा; मनसे कार्यकर्त्यांनी मॅनेजरच्या कानशीलात लगावली, काळं फासलं पाहा, VIDEO

हुडकोसोबत करार ११,३०० कोटींचा वित्तपुरवठा

दुसरा महत्त्वाचा करार एनएमआरडीए आणि हुडको (Housing and Urban Development Corporation Ltd.) यांच्यात करण्यात आला. या कराराअंतर्गत हुडको ₹११,३०० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये ६,५०० कोटी रुपये नवीन नागपूरसाठी भूसंपादन, व्यावसायिक विकास आणि पायाभूत सुविधा, ४,८०० कोटी रुपये नागपूर बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादन या निधीमुळे "नवीन नागपूर" प्रकल्पाची संकल्पना आणि "नागपूर बाह्य वळण रस्ता" यांसारखे पायाभूत प्रकल्प वेगाने आकार घेतील. या भागीदारीत कार्यशाळा, प्रशिक्षण व क्षमतावृद्धी कार्यक्रमांचाही समावेश असेल.

Devendra Fadnavis :  'नवीन नागपूर'ला ११००० कोटींचा बूस्टर डोस, एनएमआरडीए आणि हुडको यांच्यात करार
Nagpur Tourism : जंगल सफारी, वाघांची हाक आणि पार्कची सफर; नागपूरमधील Hidden पार्क

या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, एनबीसीसी (इंडिया) लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक के. पी. महादेवस्वामी, हडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय कुलश्रेष्ठ, तसेच एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीणा (आयएएस) आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पांना महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष अंमलबजावणीस गती मिळणार आहे. या दोन्ही सामंजस्य करारांमुळे "नवीन नागपूर" हा देशातील एक अत्याधुनिक आणि जागतिक पातळीवरील वित्तीय व व्यवसायिक केंद्र बनण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले गेले आहे. नागपूरच्या आर्थिक कारभारासाठी हे प्रकल्प "गेम चेंजर" ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com