मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) असनी चक्रीवादळाबाबत सर्तकतेचा इशा दिला होता. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचं (Asani Cyclone) आता तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. याचाच परिणाम राज्यातही झाला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता हवामान (Weather) विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर (K S Hosalikar, Head Of India Meteorological Department, Pune) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यानुसार असनी चक्री वादळाचा प्रभाव राज्यातल्या अनेक भागात होणार आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या ठिकाणाही ढगाळ वातावरण असेल. असनी चक्रीवादळाचा परिणाम कर्नाटक आणि केरळ या राज्यांवरही होणार आहे. (Cloudy weather in many parts of the Maharashtra; Chance of a drizzle of rain)
हे देखील पाहा -
असानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांचे हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सक्रियपणे काम करत आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, किनारपट्टीजवळ आल्यानंतर असनी चक्रीवादळ पुन्हा उत्तर-ईशान्य दिशेने वळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. असनी चक्रीवादळ पूर्व किनार्याच्या दिशेने हे वादळ पुढे जात असून, त्यामुळे बाधित भागात ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून काही भागात पाऊसही पडताना दिसत आहे. (Asani Cyclone latest Marathi news)
हवामान विभागाने सावधानतेचा इशारा देताना मच्छिमारांनी १० मे पासून ते १२ मे पर्यंत बंगालच्या उपसागरात वायव्य दिशेला न जाण्याची सूचना केली आहे. 'असानी'चा वेग आणि तीव्रता पाहता हे चक्रीवादळ बुधवारी (११ मे) ला तीव्र चक्रीवादळात परिवर्तित होऊ शकतं आणि गुरूवारी (१२ मे) त्याचा दाब वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. दरम्यान राज्यातल्या या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली असून आज काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई-पुण्यातही उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.