Nanded Rain : नांदेडमध्ये मध्यरात्री ढगफुटीसारखा पाऊस, ५ जण दगावल्याची भीती, ४० जनावारांचा मृत्यू

Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मध्यरात्री ढगफुटीसारखा पाऊस कोसळल्याने लेंडी नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. सहा गावांचा संपर्क तुटला असून अनेक भागात पाणी शिरले आहे.
Nanded Rain Update
"Cloudburst-like rain in Nanded: Villages submerged, people rescued by NDRF and Army"Saam TV Marathi news
Published On
Summary

Nanded Rain Latest Update : नांदेडमध्ये मध्यरात्री ढगफुटीसारखा पाऊस झाला. लेंडी नदीच्या पाण्याची पातळी १८ फूट वाढली. ५ जण बेपत्ता, ४० पेक्षा जास्त जनावरं दगावली, ६ गावांचा संपर्क तुटला. NDRF व लष्कराने मदतकार्य सुरू केलं.

Nanded Maharashtra heavy rain casualties : मागील ४८ तासांत नांदेडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. रात्रीत मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे १८ फूट पाणी वाढले अन् सहा गावं पाण्याखाली गेली. एनडीआरएफकडून मदतकार्य सुरू आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये आतापर्यंत पाच जण दगावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हसनाळमधील एक व्यक्ती आणि चार महिला पूराच्या पाण्यात बेपत्ता झाल्या आहेत. आतापर्यंत अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. मुक्रमाबद येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यामध्ये लेंडी नदीचे पाणी शिरून 40 जनावरे गुदमरून मृत्यू तर 20 जनावरे वाहून गेले आहेत.

नांदेड जिल्ह्यात पूर्व परिस्थिती सांगताना गावकऱ्यांनी हंबरडा फोडला. याची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यामधील शब्द ऐकून डोळ्यातून टचकन पाणी येईल. "आमच्या गावात एक गडी मेला, चार बाया वाहून गेल्या त्या अजून सापडल्या नाहीत. एकाएकी पाणी आलं, मागचा दरवाजा मोडून लेकराला आणि सुनेला बाहेर काढलं. सामान गेलं दोन लाख रुपये आणून ठेवले होते तेही गेले. साडेचार महिन्याचे लेकरं घेऊन माळाला आलो. पैसा गेला, सोनं गेलं, जीव वाचवा म्हणून माळावर आलो," असे शब्द त्या ऑडिओ क्लीपमध्ये आहेत.

Nanded Rain Update
Accident : भयंकर अपघात! दोन कारची समोरासमोर धडक, होरपळून ८ जणांचा जागीच मृत्यू

नांदेडमध्ये पावसाने हाहाकार मुखेड तालुक्यात ढगफुटी सुदृश्य पाऊस

लेंडी धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ व ढगफुटी ,अतिवृष्टीमुळे लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी, लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे मुखेड तालुक्यातील काही गावांमध्ये नदीचं पाणी घुसले आहे. पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिंगेली , हासनाळ या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्यास राहत असल्यामुळे, पुराच्या पाण्यात अडकले. त्यातील काही नागरिकांना काढण्यात एसडीआरएफ जवानांना यश आले आहे.

मुखेड तालुक्यातील रावनगाव येथे अंदाजे 225 नागरिक पाण्याच्या वेढयामध्ये अडकलेले होते, त्यातील काही नागरिकांना एसडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू करण्यात आलेले आहे. 7 ते 8 लोक झाडावर अडकले होते, त्यांना देखील सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. उर्वरित लोकांना रेस्क्यू करण्याचं काम चालू असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

Nanded Rain Update
Ahilyanagar Fire : अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री भीषण आग, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा -

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. रविवारी येथे झालेला पाऊस सुमारे 206 मि.मी. इतका होता. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. रावनगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात असून, नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत. एनडीआरएफची 1 चमू, एक लष्करी पथक आणि पोलिसांची चमू समन्वयातून बचाव कार्य करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडी सुद्धा रवाना झाली आहे. स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभा

Nanded Rain Update
Mumbai Rain : मानखुर्दमध्ये पावसाचे तांडव, रस्त्यांवर नदी, कमरेइतके पाणी, नागरिकांची कसरत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com