Kite flying clashes: मकर संक्रातीच्या दिवशी मोठा राडा; डिजेवरून दोन गटात तुंबळ हाणामारी, धारदार शस्त्रांनी हल्ला

Nylon Manja: अहिल्यानगरच्या बालिका आश्रम परिसरात दोन गटात दगड आणि चाकूने हाणामारी झाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी जमावाला पांगवले.
Nylone Manja
Nylone ManjaSaam Tv News
Published On

अहिल्यानगर शहरात पतंग उडवण्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगरच्या बालिका आश्रम परिसरात दोन गटात दगड आणि चाकूने हाणामारी झाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी जमावाला पांगवले. या घटनेत दोघे जण जखमी असून, अद्याप कुणावरही गुन्हा दाखल नाही.

अहिल्यानगर परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला आहे. डीजे लावण्यावरून आणि पतंग उडवण्यावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हाणामारी होत असताना पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळ गाठले आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोन जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही, तसेच कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

Nylone Manja
Mahesh Kothe Death: महाकुंभमेळ्यात शरद पवार गटाच्या नेत्यानं घेतला अखेरचा श्वास, महेश कोठे यांचं निधन

महापालिका कर्मचार्‍याचा नायलॉन मांजाने गळा कापला

अकोल्यात नायलॉन मांजाने महापालिका कर्मचार्‍याचा गळा कापल्याची घटना समोर आलीये. या कर्मचाऱ्याच्या गळ्याला १५ टाके लागले असून, अकोला चायना नायलॉन मांजामुळे दुखापत झाल्याची माहिती आहे. महापालिकेचे कर्मचारी मंगेश बोपटे हा आपल्या दुचाकीने अकोल्याच्या दिशेने येत असताना गळ्यामध्ये नायलॉन मांजा अडकला आणि गळ्याला चिर पडली. या प्रकरणी खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Nylone Manja
Hiraman Khoskar: सत्ताधारी भिडले! खोसकरांचा आरोप, ऊईकेंचं प्रत्युत्तर; वाद वरिष्ठांच्या कोर्टात

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तालुका पोलि‍सांची कारवाई

जालन्यात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केलीय. या कारवाईमध्ये दहा हजार रुपयांचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केलाय. शेख इस्माईल, शेख अहेमद असं या संशयित नायलॉन मांजा विक्रेत्याचे नाव असून, त्याच्यांवर जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com