सध्या देशभरात कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीचं स्कूल ठीक करो अभियान सुरू आहे. सीजेपीनं अनेक शाळांमधील दुरवस्थेचं भयाण वास्तव समोर आणलंय. मात्र, या अभियानामुळे सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही शाळांची पाहणी करणारे अभिजीत दिपकेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर सीजेपीनं मात्र प्रशासनाला थेट आव्हान दिलंय. शाळेचं वास्तव समोर आणणं गुन्हा असेल तर अशा अनेक गुन्हे घेण्यासाठी तयार असल्याचं सीजेपीनं म्हटलंय...
दरम्यान, सीजेपी विरोधात गुन्हे नेमके कशामुळे दाखल करण्यात आलेत ते पाहूयात...
दिपकेंवर नेमके आरोप काय?
20 ऑगस्टला दुपारी सव्वा एकच्या सुमारास अभिजीत दिपके अन्य काही जणांसह शाळेत गेले होते. दिपकेंनी विद्यार्थ्यांमध्ये बसून विविध प्रश्न विचारत शिक्षकांच्या शैक्षणिक आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसंच, शाळेची परवानगी न घेता चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आलाय. शाळेतील विद्यार्थी असतानाही दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी आणून बसवले असल्याचे सांगत दिपकेंनी शाळेची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. यावेळी शिक्षकांना अपशब्द वापरुन, त्यांना निलंबित करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय.
दिपकेंच्या अभियानातून राज्यातील अनेक सरकारी शाळांमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. अनेक सरकारी शाळांमध्ये लाईट सोडाच, साधं शौचालय देखील नसल्याचं वास्तव समोर आणलंय. काही दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका आणि त्यांचे सहकारी शाळेच्या दिशेने जात असतानाच, गावात दबा धरून बसलेल्या राजकीय गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यानंतर हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आशुतोष आणि दिपकेंनी केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात सीजेपीच्या अभियानाला रोखण्यासाठी दिपकेंनाच कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची तयारी सुरू झालीये का, अशी चर्चा सुरू आहे. प्रशासनाच्या या आव्हानाला दिपके कसं प्रत्युत्तर देणार?... सीजेपीचं पुढची वाटचाल नेमकी कशी असणार?... याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.