Maratha Reservation: जरांगे पाटलांच्या उपोषणांवर राजकारण तापलं; मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं, नाना पटोलेंचा आरोप

Nana Patoles Allegation: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनामुळे राज्य सरकारचं टेन्शन वाढलं होतं.
Nana Patoles Allegation
Nana Patoles AllegationSaam Tv
Published On

Nana Patoles Allegation On CM:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातल्या अंतरवाली गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवस उपोषण केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनामुळे राज्य सरकारचं टेन्शन वाढलं होतं. राज्य सरकारनं सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. परंतु या उपोषणांवरून विरोधक सरकारवर टीका करण्याची संधी मात्र सोडत नाहीत.

मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच उपोषणाला बसवल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलानात जाणून बुजून लाठीचार्ज करण्यात आला. तर हे सरकार दोन समाजात भांडणं लावत असल्याचा आरोप देखील नाना पटोलेंनी केलाय.यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा तापणार असल्याचं चिन्ह आहे. (Latest News On Politics)

जालन्यामध्ये आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं. ३१ तारखेला मध्यरात्री आंदोलक संतप्त झाले आणि १ तारखेला ३ वाजता गृहमंत्र्यांनी सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. दरम्यान यादिवशी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होती. या बैठकीवरून लक्ष वळवण्यासाठी लाठीचार्जची घटना घडवण्यात आली, असा आरोप पटोले यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलेलं होतं, हे आता सिद्ध झालेलं आहे.

कारण सौम्य लाठीचार्ज झाला आणि फडणवीसांनी माफी मागितली. हे सरकार दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करत असल्याचा आरोप पटोलेंनी केला. नाना पटोलेंनी थेट उपोषणकर्त्यांवर प्रश्न उपस्थित केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाना पटोलेंनी आरक्षणाविषयी काँग्रेसचीही भूमिका मांडली. काँग्रेसची आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. जे मागास आहेत त्यांना न्याय मिळाले पाहिजे.

कोणाच्या तोंडचा घास हिरावून नव्हे तर जातीनिहाय जनगणना करून आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसींना २७ टक्के तसेच मराठा, धनगर यांना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून पुढे आरक्षण दिलं पाहिजे, असं

Nana Patoles Allegation
Narayan Rane News | मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नको, अस राणे का म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com