Fact Check: 200 च्या नोटवर छत्रपती शिवरायांचा फोटो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Chhatrapati Shivaji Maharaj Photo On 200 Notes : सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झालाय. त्यात २०० रुपयांच्या नोटांवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आलाय.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj Photo On 200 NotesSaam Tv
Published On

200 रुपयांच्या नवीन नोटा आता चलनात येणार आहेत.आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापला जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय.खरंच आता दोनशे रुपयांच्या नोटेवर शिवरायांचा फोटो छापला जाणार आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

आता 200 रुपयांच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापणार असल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय.महाराजांचा फोटो असलेली ही नोट प्रचंड व्हायरल केली जातेय. बघा, या नोटेवर महाराजांचा फोटो दिसतोय.त्यामुळे ही नोट आता चलनात येणार आहे की कुणी खोडसाळपणा केलाय? शिवरायांचा फोटो असलेली नोट असेल तर ही आनंदाचीच बातमी आहे.मात्र, या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj : ....म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत - देवेंद्र फडणवीस

व्हायरल मेसेज

आता 200 रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधींऐवजी शिवाजी महाराजांचा फोटो असणार आहे. भारत सरकारने एक निर्णय घेतलाय. हा मेसेज प्रचंड व्हायरल होत असून, यासोबत फोटोही आहे...याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने आरबीआयच्या साईटवरून अधिक माहिती मिळवली.मात्र, तिथे या नोटेबाबत माहिती मिळाली नाही.त्यामुळे आम्हीच या फोटोची सत्यता पडताळून पाहिली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज 'या' गोष्टींमुळे आहेत Great King

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

सोशल मीडियावर व्हायरल केलेला फोटो खोटा

200 च्या नोटेवर महात्मा गांधींचाच फोटो असेल

नोटबंदीनंतर 200 ची नोट चलनात आली

देवदेवतांचे फोटो छापा अशी मागणी केजरीवालांनी केलेली

केजरीवालांच्या मागणीनंतर अनेक फोटो व्हायरल झाले.

Chhatrapati Shivaji Maharaj
Chatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू कोण होता?

सध्या औरंगजेबाची कबर, शिवरायांबाबत वादग्रस्त विधान यावरून महाराष्ट्रात वाद पेटलाय. त्यामुळे आता महाराजांचा फोटो असलेली नोट पुन्हा व्हायरल करण्यात आलीय. मात्र, 200 च्या नोटेवर महाराजांचा फोटो छापला जाणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जातायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com