Bharat Jadhav
शिवाजी महाराज हे जन्माने राजपूत्र नव्हते. त्यांनी मुघल, निजाम, आदिशाही, ब्रिटीशांशी झुंज देऊन स्वराज्य तयार केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:साठी एकही महाल बांधला नाही. तर जनतेचं रक्षण करता यावं म्हणून त्यांनी 100 पेक्षा जास्त किल्ले उभारले.
आधी स्थानिक कर्ज वसूलदार हे लोकांकडून कोणत्याही नियमाविना शेतसारा गोळा करत. पण शिवाजी महाराजांनी ही पद्धत बदलली. त्यांनी शेतसारा कमी केला.
शिवाजी महाराजांनी शेती करण्यासाठी सरकारी जमीन या लोकांना देऊन त्यांना शेती करण्यास मदत केली. अनेक धरणंही बांधली.
शिवाजी महाराज हे फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणूनही लोकप्रिय आहेत. महाराजांनी स्वराज्यात स्वःताचे आरमार उभारले. त्यांनी ४०० पेक्षा अधिक बोटी व जहाजे निर्माण केली.
महाराजांनी रयतेला फायद्याचे ठरतील असे अनेक कायदे त्यांनी त्यावेळीच तयार केले. स्त्रियांच्या संरक्षणासंबंधी अनेक कायदे त्यांनी तयार केले होते.
शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात धर्मनिरपेक्षतावादी राजा म्हणून ओळखले जातात.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासैन्यात अनेक मुस्लिम सैनिक त्यांचे कित्येक अंगरक्षक हे मुस्लिम होते. 18 पगड जातींची लोकं त्यांच्या सैन्यात होती.