Chhatrapati Sambhajinagar: गुजरात पोलिसांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये छापे; तब्बल ५०० कोटींचे कोकेन जप्त

Chhatrapati Sambhajinagar News: DRIच्या पुणे, मुंबई आणि अहमदाबाद टीमने छत्रपती संभाजीनगर शहरात मोठी कारवाई केली आहे.
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarSaamtv
Published On: 

Chhatrapati Sambhajinagar News:

राज्यात सध्या ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरण चांगलेच गाजत आहे. कोट्यवधींच्या ड्रग्ज तस्करीचा आरोप असलेल्या ललित पाटील प्रकरणाने नाशिकमधील मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ड्रग्जरॅकेट प्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून कोट्यवधींचे कोकीन जप्त केल्याची बातमी समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, DRI च्या पुणे, मुंबई आणि अहमदाबाद टीमने छत्रपती संभाजीनगर शहरात मोठी कारवाई केली आहे. DRI च्या या कारवाईत छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात कोट्यवधी रुपयांचे कोकेन सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कोकेनची किंमत तब्बल ५०० कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप याला दुजोरा दिला नाही. या कोट्यवधी रुपयांच्या कोकेनसोबत दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई, नाशिकनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही मोठ्या प्रमाणात कोकेन सापडल्याने खळबळ उडाली असून शहरातील मोठे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

Chhatrapati Sambhajinagar
Beed News: जिजाऊ मल्टिस्टेट बँकेचा 100 कोटींचा घोटाळा; 51 स्थावर मालमत्ता होणार जप्त

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तस्करीची प्रकरणे समोर येत आहेत. याआधी मुंबई (Mumbai) नाशिक (Nashik) तसेच सोलापूरमधूनही (Solapur) मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही कोकेनचा साठा सापडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhatrapati Sambhajinagar
Electric Shock: रस्त्यावरील विद्युत तारेचा करंट लागून कंटेनरचा क्लिनर ठार; पंधरा दिवसातील दुसरी घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.