Buldhana Water Crisis:
Buldhana Water Crisis: Yandex

Water Crisis News: छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाच्या झळा! पाण्याला मिळतोय सोन्याचा भाव; टँकर वाल्यांची चांदी

Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अशावेळी टँकरची मागणी वाढल्यामुळे त्याचे भावही चांगलेच वाढल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसत आहे.

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. ७ मे २०२४

राज्यात सध्या दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अशावेळी टँकरची मागणी वाढल्यामुळे त्याचे भावही चांगलेच वाढल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा आणि देवळाई परिसरात सध्या चांगलीच पाणी टंचाई जाणवू लागल्याने नागरिक आता हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालल्याने प्रचंड प्रमाणात पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्याच चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात टँकरची संख्या वाढली असून त्यांचे दरही वाढले आहेत.

२ हजार लिटरच्या टँकरपासून तब्बल २० हजार लिटरच्या टँकरपर्यंत जम्बो टँकरची मागणी वाढली असून या भागातील बहुतांश भागात टँकरच्या फेऱ्यांची ऍडव्हान्स बुकिंग वाढले आहे. खाजगी टँकर वाल्यांचे २ हजार लिटर ३५० ते ४०० रुपये, ५ हजार लिटर ६०० किंवा त्यापेक्षा अधिक पैसे, १० हजार लिटर १२०० रू तर २२ हजार लीटर पाणी चक्क २ हजार ५०० रुपयांना विकले जात आहे.

Buldhana Water Crisis:
Baramati Lok Sabha Election: बारामती लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 228 मतदारांनी बजावला हक्क

दरम्यान उन्हाचा उकळा वाढल्याने जनतेला पाण्याची सोय मनपाने अजून पूर्ण केली नसून काम सुरू आहे. परंतु सध्या तरी जनतेला पाण्यासाठी उन्हाळ्यातच मोठा सामना करावा लागल्याचे चित्र दिसत आहे. अद्याप मे महिना बाकी असताना दृष्काळजन्य परिस्थिती दिसत असल्याने आगामी काळात पाणी टंचाईची दाहकता वाढताना दिसणार आहे.

Buldhana Water Crisis:
Ahmednagar News: मोठी बातमी! अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक; परिसरात मोठी खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com