छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरील हा व्हिडिओ आहे.... कौटुंबिक वादातून आणि नैराश्यातून आत्महत्या करण्यासाठी हा 19 वर्षीय मुलगा डोंगराच्या कड्यावर गेला होता...त्याचवेळी मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडीलांचाही मुलासोबत डोंगरावरू पडून दुर्देवी मृत्यू झाला...मात्र हा संपूर्ण प्रकार सुरु असताना स्थानिकांनी आणि तिथल्या सरपंचांनी तरुणाला वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले....त्य़ाचं मनपरिवर्तन करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला....आत्महत्येपूर्वी तरुणासोबत सरपंचांचं आणि स्थानिकाचं काय संभाषण झालं ऐका...
आईकडे बघून तरी असा निर्णय घेऊ नकोस, असं कित्येकदा आजूबाजूला असणारे पोलीस अधिकारी आणि स्थानिक तरुणाला समजावत होते...विशेष म्हणजे हा सगळा प्रकार घडत असताना तरुणाची आईही त्याच्यासोबत होती..मात्र तो कोणाचच ऐकायला तयार नव्हता...
हा सगळा थरार सुरू असतानाच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले...अग्निशमन विभागानं जाळीच्या माध्यमातून डोंगराखाली सुरक्षाकवचही उभारलं..त्यावेळी गर्दीतून तरुणाला वाचवण्यासाठी त्याचे वडीलही समोर आले....उंचावरून खाली पडल्यामुळे मुलासह आई-वडीलांचाही जागीच मृत्यू झाला. मात्र वडीलांसोबत मुलाची काही कारणांवरून भांडण झाल्याचाही पोलीसांना संशय आहे....त्यामुळे पोलीस नमक्या कारणाचा शोध घेतायत...मात्र तरुणामधील नैराश्य आणि कौटुंबिक वाद संपूर्ण कुटुंबाच्या विनाशाचं कारण ठरल्यानं संभाजीनगरमध्ये एकच खळबळ माजलीय...मानसोपचार तज्ज्ञ याप्रकरणी काय म्हणाले ऐका...
दरम्यान मानसिक स्वास्थ्य आणि समुपदेशन माणसांच्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे... याची प्रचिती या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित झालीय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.