शिवभक्तांना अडविण्याची चूक करू नये; विशाळगडाच्या मुद्यावरून संभाजीराजे छत्रपतींची लक्षवेधी पोस्ट, सरकारलाही दिलं आव्हान

Sambhaji Maharaj Chhatrapati: विशाळगडाच्या अतिक्रमणावरून संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या गडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून त्यांनी शासन आणि प्रशासनाला इशारा दिला आहे
शिवभक्तांना अडविण्याची चूक करू नये
Sambhaji MaharaJ Chhatrapati Canva
Published On

मुंबई : विशाळगडावर अतिक्रमण हटविण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गड पायथ्याचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई थांबवण्यात आली. मागील दीड वर्षांपासून कारवाई थांबवण्यात आली, अशा आशयाची पोस्ट करत अतिक्रमण हटविण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी कारवाईची मागणी केली आहे. संभाजीराजे छत्रपतींनी लक्षवेधी पोस्ट करत सरकारचं लक्ष वेधलं आहे.

संभाजीराजे छत्रपतींनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

संभाजीराजे छत्रपतींनी पोस्ट करत म्हटलं की, विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात ४ जुलै रोजी विशाळगडाला प्रत्यक्ष भेट दिली होती. या भेटीदरम्यान गडावरील परिस्थितीची पाहणी केली होती. यानंतर ७ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची बैठक बोलवली होती. या बैठकीत विशाळगडावर पशूपक्षी हत्याबंदी लागू करण्यात आली होती. तसेच, अतिक्रमणे पुढील ३ महिन्यांत हटविण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिली होती'.

शिवभक्तांना अडविण्याची चूक करू नये
Maharashtra Politics: विधानसभेआधी राज्यात नवी युती पाहायला मिळणार, संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चा

'गडावरील अतिक्रमण हटविण्याची जुजबी कारवाई करण्यात आली. मात्र, स्थानिक आमदारांसोबत प्रतिबैठक झाली. त्यानंतर सर्वच कारवाई थांबविण्यात आली. मागील दीड वर्षांपासून प्रशासनाने कोणतीच कारवाई केलेली नाही. सध्या सत्तेत असलेल्या स्थानिक राजकीय नेत्याच्या दबावामुळे हा न्यायप्रविष्ट विषय असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. न्यायालयात काही पाठपुरावा करण्याचे कष्ट प्रशासनाने घेतले नाहीत. सुमारे दीड वर्षांत न्यायालयाची एकही तारीख घेतली नसल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपतींनी केला आहे.

'शिवभक्त १४ जुलै रोजी मोठ्या संख्येने गडावर जाणार आहे, त्यामुळे शिवभक्तांचा आक्रोशामुळे आज या विषयावरील बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठका आणि प्रतिबैठकांचे खेळ याआधी आम्ही पाहिलेले आहेत. आता बैठकांचा दिखावा नको, तर प्रत्यक्ष कार्यवाही करा, हीच शिवभक्तांची मागणी आहे. त्यामुळे या दिखाऊ बैठकीवर बहिष्कार टाकत आहोत, असे संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केले.

'विशाळगडाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण केले, स्वराज्याचे रक्षण केले अशा ऐतिहासिक प्रेरणास्थळाला वंदन करण्यासाठी विशाळगडावर जाणे हा आमचा, सर्वांचा अधिकार आहे. शासन आणि प्रशासन व इतर कुणीही शिवभक्तांना अडविण्याची चूक करू नये. शासन व प्रशासनास आम्ही इशारा देऊ इच्छितो, अजूनही तीन दिवस राहिलेले आहेत. बैठकांचा खेळ दाखविण्यापेक्षा कारवाईची धमक दाखवा, असा इशारा संभाजीराजे छत्रपतींनी दिला.

शिवभक्तांना अडविण्याची चूक करू नये
Maharashtra Politics 2024 : 'ठाकरेंकडून संभाजीराजे छत्रपतींचा अपमान'; व्हिडीओ दाखवून उदय सामंतांचा खळबळजनक दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com