Maharashtra Politics: विधानसभेआधी राज्यात नवी युती पाहायला मिळणार, संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Maharashtra Vidhansabha Election 2024: माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे नेते संभाजी राजे छत्रपती आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांची पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये भेट झाली.
Maharashtra Politics: विधानसभेआधी राज्यात नव्या युतीची नांदी! छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू एकत्र येणार? पुण्यातील भेटीत झाली चर्चा
Bacchu Kadu|Sambhajiraje ChhatrpatiSaamtv
Published On

रणजित माजगावकर, ता. ९ जुलै २०२४:

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी विविध पक्ष, राजकीय संघटनांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे महायुती, महाविकास आघाडीमध्ये राजकारण रंगत असतानाच विधानसभेआधी नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी खासदार शाहू महाराज छत्रपती आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या भेटीने राजकीय वर्तुळामध्ये या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Maharashtra Politics: विधानसभेआधी राज्यात नव्या युतीची नांदी! छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू एकत्र येणार? पुण्यातील भेटीत झाली चर्चा
Pune Hit And Run: हरवलेल्या मुलीला शोधून आई-बाबांकडे सोपवलं; पण घरी जाण्याआधीच पोलीस कर्मचाऱ्याला मृत्यूने गाठलं

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे नेते संभाजी राजे छत्रपती आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांची पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आगामी निवडणुका एकत्र लढवण्याबाबतही यावेळी विचार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुणे इथं आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून बच्चू कडू यांना निमंत्रित करण्यात आले होते.

Maharashtra Politics: विधानसभेआधी राज्यात नव्या युतीची नांदी! छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू एकत्र येणार? पुण्यातील भेटीत झाली चर्चा
Nashik Dengue Update: नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३६५ वर; आरोग्य विभाग अलर्ट

स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू यांच्या झाली प्राथमिक चर्चा झाली. तसेच राज्यभरातील घटक पक्षांना एकत्रित करुन निवडणुकीत आव्हान उभे करण्याचाही विचार झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या भेटीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या युतीची नांदी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Politics: विधानसभेआधी राज्यात नव्या युतीची नांदी! छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू एकत्र येणार? पुण्यातील भेटीत झाली चर्चा
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट; कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com