शिक्षकांनी जोडधंदा थांबवावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिला आहे. जिल्ह्यातील जोडधंदा करणाऱ्या शिक्षकांचा गटविकास अधिकाऱ्यांनी शोध घ्यावा, असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. त्यानुसार, येत्या ८ नोव्हेंबरपासून गटशिक्षणाधिकाऱ्यांची पथके जोडधंदे करणाऱ्या शिक्षकांचा शोध घेणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
चांगली पगार आणि वेळेवर सुट्ट्या मिळत असूनही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक पैशांच्या लालसेपोटी जोडधंदा करीत असल्याचं उघडकीस आलं आहे. विद्यार्थ्यांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करीत शिक्षक जोडधंद्यावर आपलं लक्ष केंद्रीत करीत आहेत. त्यामुळे शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होतं आहे.
यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षकांनी वेळीच सावध राहून ताबडतोब जोडधंदा बंद करावा आणि अध्ययन-अध्यापनावर लक्ष केंद्रीत करावे, असे आदेश जारी केले आहेत. जर आदेशाचं पालन न केल्यान कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिला आहे.
इतकंच नाही तर, विकास मीना यांनी जोडधंदा करणाऱ्या शिक्षकांचा शोध घेण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची पथके तैनात केली आहे. येत्या ८ नोव्हेंबरपासून ही पथके जिल्हाभरातील जोडधंदा करणाऱ्या शिक्षकांचा शोध घेणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी जर कामात हलगर्जीपणा केला तर त्यांना कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
शिक्षकांनी फक्त शाळेच्या वेळेत मुलांना शिकवावे एवढेच नाही, तर त्यांनाही अभ्यास करावा लागणार आहे. नवनवीन बदलांविषयी अपडेट राहावे लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी घेतलेल्या या निर्णयाचं पालकांकडून स्वागत केलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.