Chhatrapati Sambhaji Nagar Crime: घरमालकाचं भयानक रूप; दारू पिऊन आला अन् विद्यार्थ्यांसोबत केलं भयंकर कृत्य

Crime News Today in Marathi: छत्रपती संभाजी नगर येथील धक्कादायक घटना
Chhattisgarh Crime News
Chhattisgarh Crime NewsSaam TV

Chhatrapati Sambhaji Nagar News Today: राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, क्षुल्लक कारणावरून हत्या या सारख्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

त्यातच आता छत्रपती संभाजी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर घरमालकाने दारू पिऊन चाकूने हल्ला केला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Chhattisgarh Crime News
Nagpur Police Raid: रिसॉर्टवर सुरू होता धक्कादायक प्रकार; अचानक पोलीस धडकले, ६ तरुणींसह १२ पुरुष सापडले (Video)

नेमकं प्रकरण काय?

भाड्याच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर घरमालकाने दारू पिऊन चाकूने हल्ला केल्याची घटना छत्रपती संभाजी नगरात घडली आहे. या चक्कूहल्यात सैनिकी पूर्व शिक्षण घेणारे चार विद्यार्थी जखमी झाल्यानंतर असून त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत.

ज्या रूममध्ये हा भयंकर प्रकार घडला तिथं घरभर रक्तच रक्त होत. याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही. फुलंब्री तालुक्यातल्या वाघोळा येथील चार विद्यार्थी सैनिकी पूर्व शिक्षण घेण्यासाठी छत्रपती संभाजी नगरातील सिडकोमध्ये राहत होते. (Crime News)

Chhattisgarh Crime News
Rahul Gandhi News : अमेरिकेतील कार्यक्रमात अँकरकडून 'माजी खासदार' म्हणून ओळख, त्यावर राहुल गांधीची उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाले...

ज्या भाड्याच्या घरामध्ये रूममध्ये राहत होते त्या मालकांनी तुमच्या रूमचा दरवाजा बंद करा असे सांगितले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी आम्ही स्वयंपाक करून लगेच दरवाजा बंद करतो असे सांगितल्यानंतर घरमालकाने रागाच्या भरात चाकू घेऊन हल्ला केला. या चार विद्यार्थी जखमी झाले असून दोघेजण गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com