
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. परंतु मध्येच अचानक पावसाच्या सरी बरसतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र फटका बसतो. दरम्यान, टॉमेटोला तर याचा चांगलाच फटका बसत आहे. टॉमेटोचे भाव घसरले होते. त्यानंतर आता शेतकऱ्याच्या एक किलो टोमॅटोला तब्बल ३०६ रुपये भाव मिळालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या देवगाव रंगारी उपबाजार समितीच्या मार्केटमध्ये मुहूर्ताच्या जाहीर लिलावमध्ये टोमॅटोला प्रति किलो ३०६ रुपयांचा भाव मिळालाय. यामुळे शेतकऱ्याला मात्र खूप आनंद झाला आहे.
ताडपिंपळगाव येथील शेतकरी सादिक उस्मान शेख यांच्या शाहू वाणाच्या टोमॅटोला ३०६ रुपये प्रती किलोचा उच्चांकी भाव मिळाला. आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव असावा. याच प्रती किलो ६० रुपये भावाने १८ कॅरेट म्हणजे ३६० किलो टोमॅटोला व्यापाऱ्यांनी खरेदी केले. तर कमीतकमी शेवटच्या कॅरेटमधील टोमॅटोला सरासरी १०० रुपये प्रति किलो भाव मिळाला.
देवगाव रंगारी येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात सोमवारी टोमॅटो खरेदी-विक्री लिलावास प्रारंभ झाला. देवगाव रंगारी परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट शेतात जाऊन व्यापारी खरेदी करीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नव्हता. मात्र, मागील वर्षापासून बाजार समिती पदाधिकारी, व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीत ठरल्याप्रमाणे आता देवगाव रंगारी येथेच शेतमालाचा जाहीर लिलाव केला जातो. यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे.
सोमवारी या हंगामातील लिलावाच्या पहिल्याच दिवशी ५ हजार ६७८ कॅरेटची आवक झाली. लिलावात सर्वप्रथम आलेले ताडपिंपळगाव येथील शेतकरी सादिक उस्मान शेख यांच्या शाहू वाणाच्या टोमॅटोला ३०६ रुपये प्रती किलोचा उच्चांकी भाव मिळाला. शेख यांनी १८ कॅरेट (एका कॅरेटमध्ये २० किलो) टोमॅटोची विक्री केली. यातून त्यांना ८२ हजार ५३० रुपये मिळाले. देवगाव रंगारी येथील शेतकरी संतोष हिवाळे यांना २०१ रुपये दर मिळाला. त्यांनी ११ कॅरेट टोमॅटोची विक्री केली. त्यानंतर दिवसभर सरासरी ५४ रुपये किलोचा भाव मिळाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.