तहसीलदार ६.४० लाखांची लाच घेताना रंगेहाथ सापडला; एसीबीच्या कारवाईने महसूल विभागात खळबळ

tehsildar bribe news : अवैध वाळू उपसा प्रकरणात लाच घेताना तहसीलदार रंगेहाथ सापडला. एसीबीने केलेल्या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
tehsildar news
tehsildar bribe news Saam tv
Published On
Summary

छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्याला लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक

६ लाख ४० हजारांची लाच घेताना तहसीलदार रंगेहाथ सापडला

कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ

बीडमध्ये पोलीस अमलदाराला लाच घेतल्याप्रकरणी अटक केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्येही अधिकाऱ्याने लाच स्वीकारल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अंबडच्या तहसीलदारला ताब्यात घेतलं. विजय चव्हाण असे तहसीलदाराचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदाराला शनिवारी रंगेहाथ पकडलं. एसीबीच्या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराकडून वाळू उपसा करणाऱ्या पोकलँड मशीनवर कारवाई न करणे आणि वाळू वाहतूक करणारे सहा ट्रक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यासाठी तहसीलदारांनी पैशांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी विभागणी केली. त्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने सापळा रचण्यात आला.

tehsildar news
Bribe Case : पोलीस दलात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडलं

बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांनी ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारत होते. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

tehsildar news
'लाचेचा' कारभार! क्लास वन अधिकारी दीड लाखांची लाच घेताना रंगेहाथ सापडला, दोघे जण 'एसीबी'च्या ताब्यात

बीडमध्ये पोलीस अमलदाराला लाच घेताना अटक

पोलीस अमलदाराने तक्रारदाराकडे अपघातामध्ये मृत झालेल्या वडिलांचे विम्याच्या दाव्यासाठी कागदपत्र देण्यासाठी 15 हजारांची लाच मागणी केली. या प्रकरणात दहा हजार रुपये स्वीकारताना पोलीस अमलदाराला रंगेहाथ पकडलं.

दत्तात्रय बळवंत असे अटक केलेल्या पोलीस अमलदाराचे नाव आहे. पोलीस अमलदाराला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने खळबळ उडाली असून बीडमध्ये लाचखोरीच्या घटना थांबणार कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com