Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Thackeray brothers on one stage, but are the core issues resolved? : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे १९ वर्षानंतर एकाच मंचावर येत आहेत. त्याबाबत माजी शिवसैनिक छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. पण यावेळी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Raj and Uddhav Thackeray to lead a historic Marathi Unity rally on July 5 in Worli, marking a powerful political statement. saam tv
Published On

Why did Raj Thackeray separate from Uddhav? Bhujbal raises question : मूळ शिवसेना मराठी मुद्द्यावर जन्माला आली. त्याच मुद्द्यावर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे. - या मेळाव्याला माझ्या शुभेच्छा आहेत. मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत. दोन भावांनी एकत्र यावे, अशी लोकांची इच्छा आहे. आम्हाला सुध्दा असे वाटतं की ते एकत्र यावेत, पण असं होणार आहे का? राज ठाकरे का दूर गेले? ते कारण सुटले का? संपले का? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका कार्यक्रमासाठी एकत्र आले आहेत. निवडणुकांसाठी ते एकत्र येथील का नाही? याची मला काही कल्पना नाही. एकत्र येणे शक्य आहे का? ते येणारा वेळ सांगेल. आता दोघांनी सांगितले आहे आम्ही आमच्या भांडणापेक्षा मराठी मुद्दा जास्त महत्वाचं आहे. मनापासून एकत्रीत येणं हे वेगळं आहे, ज्या मुद्यावर ते वेगळे झाले ते प्रश्न सुटले का? असे छगन भुजबळ म्हणाले. कदाचित पुढे जाऊन दोघांमधील प्रश्न सुटतील. सभा आणि रॅली पुरता ते एकत्र आले आहेत. पण त्यांचे मनोमिलन झाले पाहिजे. ही लोकांची इच्छा आहे. लोकांची इच्छा आहे ते एकत्र आले पाहिजेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या विषयवर बोलले. मात्र पवार फॅमिली एकत्र येणार का? या विषयावर बोलण्यास त्यांनी टाळलं.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

केडियावर काय म्हणाले भुजबळ ?

मराठी माणूस ज्या राज्यात गेले आहेत, त्याठिकाणी ते त्या राज्याचे भाषा बोलतात. मराठी बोलणारच नाही हे काही बरोबर नाही. जे मंडळी मराठी बोलणार नाहीत, असे सांगतात ते परदेशी गेल्यावर इंग्रजी बोलतात, असे छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवरही भुजबळ यांनी आपलं मत व्यक्त केलेय. एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातसोबत जय महाराष्ट्र देखील म्हटले आहेत. गुजराती समाजाचा कार्यक्रम होता आणि वातावरण देखील होत त्यामुळे ते म्हणाले असतील.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Thackeray Brothers : राज-उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्ष एकत्र करावेत, विजयी मेळाव्याआधी भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com