
मला आधी दिल्लीत जायचं होतं, तेव्हा सांगितलं की राज्यात गरज आहे, राज्यात लढा, पण येथेही डावललं गेलं असं म्हणत पुन्हा एकदा आमदार छगन भुजबळ यांनी पक्षाप्रती नाराजी व्यक्त केलीय. मंत्रिमंडाळात स्थान न देण्यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचा शंका असल्याचंही भुजबळ म्हणालेत. मंत्रिमंडळात डच्चू मिळाल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांनी आपल्या पक्षातील नेत्यांविरोधात दंड थोपटण्यास सुरुवात केलीय.
आपल्या मतदारसंघात जाऊन ओबीसी कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यांना काय वाटतं? आपण काय निर्णय घ्यावा हे मत जाणून घेत आहेत. दरम्यान भुजबळ हे काही मोठा निर्णय घेऊ शकतात असा अंदाज जाणकर वर्तवत आहेत. याच पार्श्वभुमीवर छगन भुजबळ यांनी नाशिक मध्ये ओबीसी नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शेंडगे राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. मंत्रिमंडळात बिनकामाचे नेते घेतले आणि कामाचा नेता बाहेर ठेवला असा टोला त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला लगावला.
छगन भुजबळ यांनीही पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वावर टीका केलीय. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे राष्ट्रवादी आमदार छगन भुजबळ हे नाराज आहेत. ते काहीतरी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ते राज्यातील नेत्यांशी चर्चा करत पुढील निर्णय घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी बैठकांची धडाका लावलाय.
निर्णयामुळे आम्ही त्रस्त आहोत. काहीतही गौडबंगाल आहे, असं मत ओबीसी नेत्यांनी मांडलंय. पुढील निर्णय घेण्यासाठी सर्वांसोबत चर्चा सुरू आहे. माझा वापर करू घेतला जातोय का नाही हे माहिती नाही. मात्र आपण दिल्लीत जात होतो तर राज्यात तुमची गरज आहे, येथे लढा असं सांगितलं पण आता मंत्रिमंडळातही स्थान दिलं नसल्याची टीका भुजबळ यांनी केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.