Chandrashekhar Bawankule News : शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीवरुन चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर बरसले

वर्धा येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले आहेत.
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray, saam tv

- चेतन व्यास

Chandrashekhar Bawankule News : राजकारणात उद्धव ठाकरे हे आता इतक्या खालच्या स्तरावर गेले आहेत. ज्या हिंदुत्वाचा प्रचंड प्रखर विराेध प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यांच्यासाेबत त्यांना युती करावी लागत आहे. काही दिवसांत ते ओवैसी याच्या बराेबर देखील युती करतील. विनाश बुद्धी विपरीत काल आहे असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिवसेना (Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) यांच्या युतीवर व्यक्त केली.

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Kankavali Political News : कणकवलीत नितेश राणे, वैभव नाईक समर्थकांत वाद, धक्काबुक्कीनंतर वातावरण तापलं

उद्धव ठाकरे यांच्या या भुमिकेमुळे त्यांच्यासाेबत राहिलेले शिवसैनिक त्यांची साथ साेडतील असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले. ते म्हणाले अडीच वर्षांपुर्वी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावाला तिलांजली दिली. कधी काॅंग्रेसचे तर कधी राष्ट्रवादीशी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा घोर अपमान करणारी काँग्रेस पार्टी त्यांनी मान्य केली.

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Karuna Sharma News : कार्यकर्त्यांना काय पाठवताय, स्वत: लढ; धमकीनंतर करुणा शर्मांचे धनजंय मुंडेंना चॅलेंज

आता प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांची प्रखर हिंदूविरोधी भूमिका त्यांनी मान्य केली. आम्ही मजबूत आहोत. ५१ टक्के लढाययची आमची तयारी आहे. कितीही पक्ष एक झाले तरी भाजप आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी आणि एकनाथजी यांच्या समनवयातून पुन्हा एकदा प्रचंड ताकदीने शंभर टक्के मतदान मिळवू आणि प्रचंड ताकदीने येणाऱ्या निवडणुकीत पुढे राहू असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Pune-Bangalore National Highway : खंबाटकी घाटात दाेन ट्रकचा अपघात; जाणून घ्या वाहतुकीची स्थिती

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की कोणी काय अपेक्षा व्यक्त करायच्या हा त्यांच पक्षाच काम आहे. आज मात्र हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeary) यांचा जन्मदिवस आहे. वरून बघत असतील तर त्यांना आज मोठ दुःख झालं असेल. उद्धव ठाकरे यांनी कधी अस पाऊल उचलतील की त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विरोध केला. एक टोक बाळासाहेब आणि एक टोक प्रकश आंबेडकर. इतका टोकाचा विरोध हिंदूत्वाबद्दल विचाराबद्दल केल. (Shiv Sena - Vanchit Bahujan Aghadi Alliance)

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Sindhudurg Fort : साताऱ्याच्या पर्यटकांचा किल्ले सिंधुदुर्गवर "धिंगाणा"; महिलांना चाेपलं अन् नंतर...

ज्या व्यक्तीमध्ये इतका स्वार्थ आला असे म्हणजे राजकारणाकरीता, खुर्चीकरीता इतका स्वार्थी व्यक्ती कि विचारांशी तडजाेड करुन ज्या विचारधारेवर शिवसेना स्थापन झाली ती विचारधारा त्या ठिकाणी तोडल्या गेली. खड्डयात टाकण्यात आली अशा व्यक्तीचा हा स्वार्थी राजकारणी म्हणून इतिहासात नोंद होईल.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com