Chandrapur Flood News
Chandrapur Flood News Saam TV

Chandrapur Flood : इरई नदीकाठच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती; बिल्डिंगमध्ये अडकलेल्या रहिवाशांच्या सुटकेचा थरार

Chandrapur Rain News and Update (28 Jul) in Marathi: इरई धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Chandrapur Rain Update (28 Jul):

चंद्रपूरमध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती आहे. अनेक अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी नागरिक अडकल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. इरई  धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चंद्रपूर शहरालगतचे इरई धरण सुमारे 87 टक्के भरले असून धरणाची 7 पैकी 2 दारे उघडण्यात आली आहेत. 2 आणि 6 क्रमांकाच दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत. (Maharashtra News)

Chandrapur Flood News
Cm Eknath Shinde On Uddhav Thackeray: आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो, वर्क फ्रॉम होम नाही; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

इरई नदी चंद्रपूर शहराला वळसा घालते. त्यामुळे सखल भागात पाणीपातळीत वाढ झाली आहे. शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या नदीकाठच्या राजनगर, सहारा पार्क परिसरात उंच इमारतींवर अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीद्वारे बचाव मोहीम हाती घेतली आहे. (Rain News)

प्रशासनाने नदी काठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. इरई नदी पुढे वर्धा नदीला जाऊन मिळते, मात्र वर्धा नदीलाच महापूर असल्याने इरईचे पाणी उलट दिशेने वाहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर शहराच्या अनेक भागात पूरस्थिती गंभीर होणार असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

Chandrapur Flood News
Lonavala Tata Dam News : पावसाळी पर्यटन... लोणावळ्यात पावसाची मज्जा काही औरच, टाटा धरण 90 टक्के भरले

जिल्ह्यात हलक्या प्रमाणात पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यातील आकडेवारीनुसार आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 54 टक्के एवढा पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात चंद्रपूर तालुक्यासह 5 तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com