Chandrapur: मृत्यूनंतरही मरण यातना, स्मशानभूमीच नसल्यानं तब्ब्ल 10 तासांनी पडीक जमिनीवर अंत्यसंस्कार

चंद्रपुरातील एका गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्काराविना तब्बल 10 प्रेत तसेच पडून राहिल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.
Chandrapur News
Chandrapur NewsSaam Tv
Published On

चंद्रपूर : चंद्रपुरातील एका गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्काराविना तब्बल 10 प्रेत तसेच पडून राहिल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली गावातील एका कुटुंबावर ही दुर्देवी वेळ आली. स्मशानभूमी नसल्याने कुटुंबातील सदस्याचे अंत्यसंस्कार अखेर पडीक जमिनीवर करण्यात आले (Chandrapur no cemetery in the Gojoli Village Family Had To Do Funeral On Free Land).

Chandrapur News
CoronaVirus Live Updates: गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे ३ लाख नवे रुग्ण, तर ४३९ जणांचा मृत्यू

चंद्रपूर (Chandrapur) येथील गोजोली गावात स्मशानभूमीच (Cemetery) नाही. गावातील नागरिक वनविभागाच्या एका अतिक्रमित जागेवर अंत्यविधी (Funeral ) करत असत. मात्र 5 वर्षाआधी या जागेवर वनविभागाने वृक्षारोपण केले आणि अंत्यसंस्कार करण्याची जागाच हिरावली गेली. नंतरच्या काळात गावात मृत्यू (Death) झाला, तर ग्रामस्थ स्वतःच्या शेतजमिनीत अंत्यसंस्कार करु लागले. तीच या गावाची प्रथा झाली.

मात्र, काल या गावातील पांडुरंग उराडे (70) यांचा मृत्यू झाला. त्यांची शेतजमीन 10 किमी दूर आडवळणाच्या भागात आहे. आता अंत्यविधी करायचा कुठे, असा प्रश्न कुटुंबियांना पडला. कुटुंबातील सदस्यांनी ग्रामपंचायत गाठली. अंत्यसंस्कार कुठे करायचे असा सवाल विचारला; मात्र प्रशासन आणि सरपंचांकडे याचे उत्तर नव्हते.

Chandrapur News
Fire : कॅमेरुनमध्ये एका नाइटक्लबला आग, आगीमध्ये 16 जणांचा मृत्यू,पाहा व्हिडीओ

पांडुरंग उराडे यांचा पहाटे 5 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. आप्तेष्टांनी 10 तास सरकारी कार्यालयाचे खेटे घातले. अनेक जागा शोधल्या. मात्र अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा काही मिळेना. अखेर शोधाशोध करून एक पडीक जागा शोधून कसाबसा अंत्यविधी उरकला गेला. गोजोली गावाची स्मशानभूमीची जागा अद्याप निश्चित झालेली नाही. ती भविष्यात होईल, एवढीच माहिती सरपंच देऊ शकले.

गावातील मूलभूत सुविधांमध्ये स्मशानभूमीचा समावेश असतो. गोजोली जुने गावठाण असूनही आजी-माजी लोकप्रतिनिधी ही लोकोपयोगी सुविधा उभारण्यास असफल ठरले. म्हणूनच पांडुरंग उराडे यांना जगण्याने छळले होतेच मरणाने तिष्ठत ठेवल्याचा दुर्धर प्रसंग आप्तेष्टांना बघावा लागला.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com