CoronaVirus Live Updates: गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे ३ लाख नवे रुग्ण, तर ४३९ जणांचा मृत्यू

देशामध्ये कोरोनाने चांगलेच थैमान घालत आहे.
CoronaVirus Live Updates: गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे ३ लाख नवे रुग्ण, तर ४३९ जणांचा मृत्यू
CoronaVirus Live Updates: गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे ३ लाख नवे रुग्ण, तर ४३९ जणांचा मृत्यूSaam Tv

वृत्तसंस्था: देशामध्ये कोरोनाने (Corona) चांगलेच थैमान घालत आहे. मास्क (Mask), सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या (isolation) माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. देशभरात योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून काही ठिकाणी कठोर निर्बंध (Restrictions) लावण्यात आले आहेत. सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसून येत आहे. मात्र, यादरम्यान अनेकवेळा नव्या रुग्णांच्या (patients) संख्येत वाढ देखील होत आहे. (india corona reports 306064 new covid cases and 439 deaths in the last 24 hours)

हे देखील पहा-

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल ३ कोटींचा टप्पा पार केला आहे. असे असताना आता थोडा दिलासा मिळाला आहे. देशात नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील २४ तासामध्ये देशभरामध्ये कोरोनाचे तब्बल ३,०६,०६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३ कोटींवर येऊन पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात ४ लाख ८० हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry Health) याविषयी माहिती दिली आहे. सोमवारी (२४ जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासामध्ये कोरोनाचे (Corona) ३ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४,८९,८४८ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना घरी देखील सोडण्यात आले आहे. कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस (Vaccine) घेतली आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९३.०७ टक्के आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट हा २० टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूण नव्या रुग्णांच्या संख्येपैकी ६० टक्के केसेस या ५ राज्यात आहेत. (india corona reports 306064 new covid cases and 439 deaths in the last 24 hours)

CoronaVirus Live Updates: गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे ३ लाख नवे रुग्ण, तर ४३९ जणांचा मृत्यू
Accident: पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

यामध्ये कर्नाटक (Karnataka), केरळ, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र (Maharashtra) यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये ५०२१०, केरळमध्ये ४५४४९, महाराष्ट्रात ४०८०५, तामिळनाडूमध्ये ३०५८०, गुजरातमध्ये १६६१७ रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. यादरम्यान चिंता वाढवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने या प्रकारामुळे रुग्ण बाधित होत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com