Tadoba Tiger Reserve: आनंदाची बातमी! ताडोबा पर्यटकांच्या सेवेत, आताच करा जंगल सफारीची प्लॅनिंग

Chandrapur Tadoba Jungle Safari: ताडोबा जंगल सफारीला आजपासून सुरूवात झाली आहे. जंगल सफारीसाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. ताडोबा पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्यामुळे पर्यटकांसोबत स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Tadoba Tiger Reserve: आनंदाची बातमी! ताडोबा पर्यटकांच्या सेवेत, आताच करा जंगल सफारीची प्लॅनिंग
Chandrapur Tadoba SafariSaam tv
Published On

संजय तुमराम, चंद्रपूर

ताडोबाची सफर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आताच तुम्ही ताडोबा जंगल सफारीची प्लॅनिंग करा. कारण आजपासून ताडोबा पर्यटकांच्या सेवेत आला आहे. पावसाळ्यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून ताडोबा जंगल सफारी बंद होती. पण आजपासून ताडोबा -अंधारी वाघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आजपासून ताडोबा गाभा क्षेत्र पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला. १ जुलैपासून ताडोबाचे गाभा क्षेत्र दरवर्षीप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजे पावसाळ्याचे तीन महिने बंद ठेवले जाते. या काळात बफर क्षेत्र मात्र सुरू असते. आज सकाळी सहा वाजता ताडोबा गाभा क्षेत्रामध्ये पर्यटकांचे स्वागत करत त्यांना प्रवेश देण्यात आला.

ताडोबा हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून पट्टेदार वाघांचे नंदनवन मानले जाते. त्यामुळे देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी जंगल सफारी करण्यासाठी येत असतात. पुढच्या महिनाभराची बुकिंग आधीच फुल्ल झाली आहे. यावरून तुम्हाला ताडोबाची लोकप्रियता सहज लक्षात येईल.

Tadoba Tiger Reserve: आनंदाची बातमी! ताडोबा पर्यटकांच्या सेवेत, आताच करा जंगल सफारीची प्लॅनिंग
Chandrapur News : शेतात काम करताना घडले भयंकर; मुसळधार पावसात विद्यूत तार तुटली, चौघांचा मृत्यू

आज क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी मोहर्ली प्रवेशद्वारावर पर्यटकांचे स्वागत केले आणि त्यांना रवाना केले. जंगल सफारी करायला मिळणार यामुळे पर्यटकांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. ताडोबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्यामुळे आता याठिकाणी पर्यटकांची रेलचेल सुरू राहिल. त्यामुळे स्थानिक नागरिकांना देखील रोजगार मिळेल. ताडोबा जंगल सफारी सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.

Tadoba Tiger Reserve: आनंदाची बातमी! ताडोबा पर्यटकांच्या सेवेत, आताच करा जंगल सफारीची प्लॅनिंग
Chandrapur Crime: धक्कादायक! शाळेमध्येच शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, चंद्रपूर हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com