Tadoba Tiger Reserve Forest : चंद्रपुरात १ मार्चपासून ताडोबा महोत्सव, जागतिक ब्रँडिंगसाठी वनविभागाची जय्यत तयारी

Tadoba Tiger Reserve Forest : चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 1,2,3 मार्च असे तीन दिवस 'ताडोबा महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जागतिक पातळीवर ताडोबाचे ब्रँडिंग करण्यात येणार आहे.
Tadoba Tiger Reserve Forest
Tadoba Tiger Reserve Forest Saam Digital
Published On

Tadoba Tiger Reserve Forest

चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 1,2,3 मार्च असे तीन दिवस 'ताडोबा महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जागतिक पातळीवर ताडोबाचे ब्रँडिंग करण्यात येणार आहे.  वने- वन्यजीव व पर्यावरणासंदर्भात विविध चर्चासत्रांसोबतच छायाचित्र स्पर्धा, सायकलाथॉन आदी डझनभर स्पर्धा देखील आयोजित करण्यात येत आहेत.

सोबतच कुमार विश्वास यांचे कवी संमेलन, श्रेया घोषाल यांचे गायन व शेवटच्या दिवशी सिने अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गंगा बॅले नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोपट्यांच्या गिनीज विश्वविक्रमाचा देखील प्रयत्न महोत्सवात होणार आहे.  वनविभागातर्फे राज्यात पहिल्यांदाच घोषित झालेला वनभूषण पुरस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री येथील चैतराम पवार यांना महोत्सवात देण्यात येणार आहे. महोत्सवाला मुंबईतील 40 देशांच्या वाणिज्यिक दूतावासांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, 71 देशातील 'मिस वर्ल्ड' स्पर्धक हजेरी लावणार आहेत.

Tadoba Tiger Reserve Forest
Prakash Ambedkar : ४०० नव्हे त्यांनी १५० जागा जिंकून दाखवाव्यात; प्रकाश आंबेडकरांचं नरेंद्र मोदींना खुलं आव्हान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com