Prakash Ambedkar : ४०० नव्हे त्यांनी १५० जागा जिंकून दाखवाव्यात; प्रकाश आंबेडकरांचं नरेंद्र मोदींना खुलं आव्हान

Lok Sabha Election 2024 : 'अबकी बार ४०० पार'चा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदींनी फक्त १५० जागा जिंकून दाखवाव्यात असं आव्हान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSaam Digital
Published On

Prakash Ambedkar Challenge PM Modi

'अबकी बार ४०० पार'चा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदींनी फक्त १५० जागा जिंकून दाखवाव्यात असं आव्हान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे. ते अकोला जिल्ह्यातील पारस येथे कुणबी समाज मेळावा संपन्न झाल्यावर माध्यमांशी बोलत होते.

केंद्र सरकार जमिनीवर असणाऱ्या वस्तुस्थितीपासून दूर आहे. त्यामुळेच त्यांना इतर पक्षात फूट पाडावी लागत आहे. भाजप हा इतर पक्षातील नेते आणि आमदार फोडून पक्षात घेईलही. मात्र मतदारांना ते कसे विकत घेणार?, असा प्रश्नही यावेळी आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

मराठा समाजाचा प्रश्न संसदेशी संबंधित म्हणून त्यांनी निवडणूक लढवावी

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही प्रकाश आंबेडकरांचा हा मोठेपणा असल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, गरीब मराठ्यांना आरक्षणाचा प्रश्न हा संसदेशी संबंधित असल्याने मनोज जरांगेंनी लोकसभा लढवण्याची विनंती केली आहे. त्यांनी लोकसभा लढण्याबाबतचा प्रस्ताव हा पक्षातील चर्चेनंतर दिल्या गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Prakash Ambedkar
Manoj Jarange Patil : मनाेज जरांगेंनी निवडणूक लढवावी, ते संसदेत हवेत; 'स्वाभिमानी'ने स्पष्टच सांगितलं (पाहा व्हिडिओ)

मविआला दिलेल्या प्रस्तावावर बोलण्यास नकार

महाविकास आघाडीची बुधवारी बैठक पार पडली होती. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी उपस्थित होते. वंचितने २७ जागांचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यानंतर संजय राऊत यांनी हा प्रस्ताव नसून त्यांनी इच्छा व्यक्त केल्याचं म्हटलं होतं. दरम्यान आज प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल आणि त्यांच्या जागांच्या कोणत्याही प्रस्तावाबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याच म्हणाले. काल आपल्याकडून देण्यात आलेल्या प्रस्तावाबद्दल काहीही बोलण्यास यावेळी प्रकाश आंबेडकरांनी नकार दिला. केंद्रातील सरकार हे धन दांडगे आणि व्यापाऱ्यांचं असल्याने शेतकऱ्यांनी ते उलथून टाकावं, असं आवाहनही यावेळी आंबेडकरांनी केलं आहे.

Prakash Ambedkar
Nandurbar News : दोन रेशन परवाने असूनही वितरण एकच ठिकाणी; हक्काच्या रेशनपासून अनेक लाभार्थी वंचित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com