Chandrapur Forest Aria : चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वन क्षेत्र झाले कमी; नव्या सर्वेक्षणात समोर आले वास्तव

Chandrapur news : महाराष्ट्रात हे प्रमाण १६.९४ टक्के आहे. शिवाय राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात ३५.२१ टक्के वनक्षेत्र असल्याचे म्हटले आहे. मात्र या वन क्षेत्रात दोन टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले
Chandrapur Forest Aria
Chandrapur Forest AriaSaam tv
Published On

चंद्रपूर : चंद्र्पुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र पसरलेले आहे. मात्र वन विभागाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वन क्षेत्र दोन टक्क्यांनी कमी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकीकडे देशात वन क्षेत्र वाढले असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वनाच्या क्षेत्रात घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

वन विभागाने केलेल्या सर्वेक्षणात हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यात वन सर्वेक्षण विभागाने २०२३ ची भारतातील वनांचे प्रमाण आणि स्थिती दर्शविणारी आकडेवारी जाहीर केली. यामध्ये देशात एकूण भूभागाच्या २५.१७ टक्के क्षेत्रात जंगल आहे. तर महाराष्ट्रात हे प्रमाण १६.९४ टक्के आहे. शिवाय राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात ३५.२१ टक्के वनक्षेत्र असल्याचे म्हटले आहे. मात्र या वन क्षेत्रात दोन टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे. 

Chandrapur Forest Aria
Vitthal Rukmini Puja : विठ्ठल- रुक्मिणी नित्यपूजेचे तीन महिन्यासाठीचे बुकिंग फुल्ल; मंदिर समितीला मिळणार ५५ लाखाचे उत्पन्न

मोठ्या प्रमाणात झाले होते वृक्षारोपण 

देशात वन क्षेत्र वाढले असताना आणि चंद्रपूर हा वनांचा जिल्हा असतानाही चंद्रपूरचे वन क्षेत्र कमी कसे झाले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच इथे वाघ-मानव संघर्ष वाढलेला असताना भ्रमण मार्ग तुटले असताना वन क्षेत्र कमी होणे, ही चिंतेची बाब ठरली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले असताना चंद्रपुरचे वन क्षेत्र कसे कमी झाले? असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होत आहे. 

Chandrapur Forest Aria
Cyber Crime : कंत्राट देण्याच्या बहाण्याने रेल्वे कंत्राटदाराची ४१ लाखांत फसवणूक

वन क्षेत्र दर्शविणारी आकडेवारी 
चंद्रपूर जिल्ह्यात २०२१ मध्ये ३५.४० टक्के जंगल होते. तर २०२३ च्या आकडेवारीनुसार हे प्रमाण ३५.२१ टक्क्यांवर आले आहे. तर २०२१ मध्ये घनदाट जंगल हे १३२०.८९ वर्ग किमी होते. हेच २०२३ मध्ये कमी होऊन १३१८.८७ वर्ग किमी झाले आहे. याशिवाय २०२१ मध्ये मध्यम घनदाट जंगल १५५५.३९ वर्ग किमी होते. ते घटून २०२३ मध्ये १५२१.६० वर्ग किमी झाले आहे. २०२१ मध्ये उघडे वन क्षेत्र ११७३.९९ वर्ग किमी होते. ते वाढून २०२३ मध्ये ११८९.१८ वर्ग किमी झाले. मात्र झुडपी जंगलात अल्पशी वाढ झाली असून २०२१ मध्ये ४३.६७ होते, हे प्रमाण वाढून २०२३ मध्ये ४४.०६ टक्के झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com