Chandrapur News : मतदान केंद्राबाहेर भाजप- काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची; पोलिसांचा हस्तक्षेपाने तणाव निवळला

Latest Chandrapur News : विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली
Chandrapur
Chandrapur NewsSaam tv
Published On

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात आज भाजप- काँग्रेस समोरासमोर आले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. जिल्हा परिषद कन्या शाळा येथे आझाद वार्ड नेहरू वार्डचे बुथ याठिकाणी काही काळ हा निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपाने हा वाद मिटविण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली असून याठिकाणी प्रशासनासह उमेदवारांचे कार्यकर्ते देखील फिरत आहेत. दरम्यान (Chandrapur News) चंद्रपूरच्या चिमूर शहरातील मतदान केंद्र असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळा येथे मतदारांना मदत करण्याकरीता काँग्रेस व भाजप (BJP) कार्यकर्ते लिस्ट घेऊन आहेत. याच दरम्यान हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

Chandrapur
Buldhana News : मविआचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या वॉर रूममधील कॉम्प्युटरसह साहित्य चोरी

सकाळी ९ च्या सुमारास आमदार बंटी भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया हे याठिकाणी कार्यकर्त्यासह आले. तर जिल्हा परिषदचे माजी सदस्य गजानन बुटके हेही आपल्या काँग्रेस स्टॉलजवळ पोचले. त्यांच्यासोबत बॉऊन्सर होते. आमदार भांगडिया यांनी आक्षेप घेत बॉऊन्सरना जाण्यास सांगीतले. यामुळे केंद्राबाहेर बाचाबाची सुरू झाली. यानंतर घोषणा सुद्धा देण्यात आल्या. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली.

Chandrapur
Solapur News : दक्षिण सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी; शिंदे कुटुंबीयांचा अपक्ष उमेदवाराला पाठींबा

दरम्यान भाजप व काँग्रेसच्य कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तणाव शांत केला. हे सर्व मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात घडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com