Illegal Liquor Sale : चंद्रपूर जिल्हा सीमावर्ती भागात अवैध दारू विक्री; संतप्त महिलांनी झोपडी जाळत दारू केली नष्ट

Chandrapur News : चंद्रपूर व नागपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शेत शिवारात अवैधपणे दारू विक्री केली जात होती. शेतात झोपडी टाकून अवैधपणे सुरु असलेली दारू विक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली होती
Chandrapur News
Chandrapur NewsSaam tv
Published On

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलिस ठाण्यांतर्गत साठगाव, हिवरा आणि नागपूर जिल्ह्यातील बोरगाव येथील शेकडो महिलांनी जिल्ह्याच्या सीमेवर सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद पडली. ज्या झोपडीतून दारूविक्री केली जायची, ती झोपडीही जाळून टाकत दारूचा साठा देखील नष्ट केला आहे. या प्रकरणात पोलिस दाखल होत दोन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. तर एक महिला घटनास्थळावरून फरार झाली आहे. 

चंद्रपूर व नागपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या शेत शिवारात अवैधपणे दारू विक्री केली जात होती. शेतात झोपडी टाकून हि दारूची विक्री करण्यात येत होती. अवैधपणे सुरु असलेली दारू विक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर दारू विक्रेत्याने आपला तळ ठोकला होता. त्यामुळे नागपूर पोलीस कारवाईसाठी आले की, दारु विक्रेता चंद्रपूरच्या सिमेत यायचा आणि चंद्रपूर पोलिस आले तर तो नागपूर जिल्ह्यात पळून जायचा. यामुळे त्याच्यावर कारवाई होत नव्हती. 

Chandrapur News
Cotton Price : दोन वर्षांपासून घरात ठेवलेला कापूस विक्रीला; सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनाच्या रांगा

मोर्चा काढत पेटविली झोपडी 

हा सर्व प्रकार होत असल्याने अखेर हिवरा, साठगाव आणि बोरगाव येथील त्रस्त महिलांनी या विरोधात मोर्चा काढत दारू विक्रीच्या अड्ड्यावर छापा टाकला. याठिकाणी महिलांनी धडक देत दारू विक्री करण्यात येत असलेली झोपडी पेटवून दिली. सदरच्या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर भिसी व भिवापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता महिलांनी दारू बंदी झालीच पाहिजे; अशी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. 

Chandrapur News
Dombivali Crime : डोंबिवली स्टेशन परिसरात दहा दुकानांमधून लाखोंचा मुद्देमाल लंपास; पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरची घटना

दारूचा साठा केला जप्त 

घटनेच्या वेळी महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी शेकडो दारूच्या बाटल्या फोडल्या आणि दारू विक्रीसाठी बांधलेल्या झोपडीला आग लावत नष्ट केली. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून तीन हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. तसेच घटनेत आरोपी अशोक मनोहर सगरे, स्वामी बुचलवार यांना पोलिसांनी अटक करण्यात आली. तर संगीता किसन राजपूत ही संशयित आरोपी महिला पळून गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com