५००० रुपयांची लाच घेताना आरोग्य विभागाचा कर्मचारी रंगेहाथ सापडला; एसीबीने कार्यालयात रचलेला सापळा

chandrapur bribe case : चंद्रपुरात आरोग्य विभागाचा कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ सापडला. या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
bribe case
Beed Parali NewsSaam Tv
Published On

नंदूरबारनंतर चंद्रपुरात घडला भ्रष्टाचाराचा प्रकार

आरोग्य विभागाचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई

नंदूरबारनंतर चंद्रपुरातही भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपुरातील आरोग्य विभागाच्या कार्यालयात भ्रष्टाचाराचा प्रकार घडला आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. या प्रकाराविरोधात संबंधित कर्मचार्‍याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

bribe case
Sindhudurg : सिंधुदुर्गात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB ने मुसक्या आवळल्या

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आलाय. प्रोत्साहन भत्त्याचे बिल मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तालुका समूह संघटक सुदेश महाडोळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलंय. एसीबीच्या सापळा कारवाईमुळे आरोग्य विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात सुरू आहे.

नंदूरबारमध्ये कनिष्ठ सहायक लाच घेताना सापडला

नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव पंचायत समितीतील कनिष्ठ सहायक खाअल्या सिंगा पाडवी याला 500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एका लाभार्थ्याच्या वैयक्तिक सिंचन विहीर बांधकामाचे 1 लाख 62 हजार 604 रुपयांचे अनुदान प्रलंबित होतं.

bribe case
१०००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला; पालिकेचा कर्मचारी ACB च्या जाळ्यात, प्रशासनात खळबळ

प्रस्ताव पुढे पाठवून विस्तार अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी पाडवी याने 500 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराच्या तक्रारीवरून एसीबीने धडगाव पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला. त्यानंतर लाचेची रक्कम स्वीकारताना पाडवीला रंगेहाथ पकडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com